एक्स्प्लोर

बुलेट ट्रेनचे स्वप्न दाखवणाऱ्यांनी लोकांच्या जीवाची पर्वा करावी, धनंजय मुंडेंची टीका

एल्फिन्स्टनची दुर्घटना झाल्यानंतर मुंबईतील सर्व पूलांचे ऑडिट का केले गेले नाही? या घटनेला कोण जबाबदार आहे? भावनिक राजकारण करत बुलेट ट्रेनचे स्वप्न दाखवणाऱ्यांनी लोकांच्या जीवाची पर्वा करावी. पूलाचे ऑडिट झाले असते तर आज लोकांचा नाहक बळी गेला नसता, असे धनंजय मुंडे यांनी ट्वीट करत म्हटले आहे.

मुंबई : मुंबईत पुन्हा पादचारी पूल कोसळून तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. आम्ही सभागृहात आणि सभागृहाबाहेरही मुंबईतील सर्व पूलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची वारंवार मागणी केली होती. सरकार मात्र ढिम्म बसले आहे, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. एल्फिन्स्टनची दुर्घटना झाल्यानंतर मुंबईतील सर्व पूलांचे ऑडिट का केले गेले नाही? या घटनेला कोण जबाबदार आहे? भावनिक राजकारण करत बुलेट ट्रेनचे स्वप्न दाखवणाऱ्यांनी लोकांच्या जीवाची पर्वा करावी. पूलाचे ऑडिट झाले असते तर आज लोकांचा नाहक बळी गेला नसता, असे धनंजय मुंडे यांनी ट्वीट करत म्हटले आहे.

मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील पादचारी पुलाचा भाग कोसळला आहे. हा पूल कोसळल्याने दोन महिलांसह पाच जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या दुर्घटनेत अनेक 34 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत 35 वर्षीय अपूर्वा प्रभू (35) , रंजना तांबे (40 ), जाहीद सिराज खान (32) यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे.  या घटनेतील मृतक महिला जीटी हॉस्पीटलच्या कर्मचारी असल्याची माहिती आहे.

बुलेट ट्रेनचे स्वप्न दाखवणाऱ्यांनी लोकांच्या जीवाची पर्वा करावी, धनंजय मुंडेंची टीका

घटनास्थळी अग्निशामक दलाच्या चार गाड्या आणि दोन रुग्णवाहिका पोहोचल्या असून पुलाच्या स्लॅबचा सांगाडा हटविण्याचे काम सुरु आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि टाइम्सच्या इमारतीला जोडणारा हा पुलाचा स्लॅब कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे खोळंबली आहे. या वेळेला खूप गर्दी असल्याने अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे.

सीएसएमटीजवळ पुलाचा स्लॅब कोसळला, पाहा घटनास्थळाची छायाचित्रे

या घटनेत 34 जण गंभीर जखमी झाले असून जखमींना सेंट जॉर्ज, जीटी आणि सायन रुग्णालयात जखमींना हलवलं आहे. दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. घटनास्थळी   सध्या अग्निशमन दलातर्फे मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. अग्निशमन दल आणि पोलीस यांचा समावेश आहे, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारीही या ठिकाणी आहेत आणि बचावकार्य राबवत आहेत. दरम्यान, पिंपरी चिंचवडच्या सुदुंबरे येथून एनडीआरएफची टीम मुंबईकडे रवाना झाली आहे.  सीएसएमटी स्टेशनवर पुलाचा स्लॅब कोसळलेल्या घटनास्थळी पुढील काही वेळात पोहचेल अशी माहिती आहे.

टाइम्स ऑफ इंडिया इमारतीजवळ असलेला हा पादचारी पुलाचा स्लॅब कोसळला आहे. या पुलाचा कामा रूग्णालयानजीकचा भाग कोसळला आहे. या पुलावर असलेला क्राँक्रिट स्लॅब पूर्णपणे पडलं असून आता केवळ पुलाचा सांगाडा उरला आहे. सध्या घटनास्थळावरून गर्दी हटवणं हे सध्याचं पोलिसांसमोरचं मोठं आव्हान आहे. पुलाचा सांगाडा कोसळण्याची भीती असल्याने अग्निशमन दलाचे अधिकारी तेथील गर्दी कमी करण्याचे काम सुरू आहे. ही गर्दी CST स्थानकाकडे हलवण्यात येत आहे.

दोन वर्षांआधीच स्थानिक नगरसेवकांनी या ब्रिजच्या दुरुस्तीबाबत निवेदन दिले होते. मात्र या पुलाचे ऑडिट झाले नाही, असे यावेळी स्थानिक नगरसेविका सुजाता सानप यांनी म्हटले आहे. रेल्वे अधिकाऱ्यांना या पुलाच्या ऑडिट संदर्भात पत्र दिले होते मात्र त्यांनी दुर्लक्ष केलं. या दुर्घटनेला रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याचे नगरसेविका सानप यांनी सांगितले आहे.

VIDEO 

महत्त्वाच्या बातम्या

जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
Mumbai Crime Navy Sailor: मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
Bhavesh Kaware and Raj Thackeray: मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार
मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Mumbai Crime Navy Sailor: मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Embed widget