Dhananjay Munde Accident: राष्ट्रवादी काँग्रेसचे (National Congress Party) आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना एअर अॅम्ब्युलन्सने लातूरहून मुंबईत आणण्यात आले आहे. त्याच्यावर मुंबईतल्या ब्रीच कँडी रूग्णालयात होणार उपचार होणार आहेत. धनंजय मुंडे हे परळीकडे जात असताना त्यांच्या गाडीला अपघात (Dhananjay Munde Accident News) झाला. त्यांनी स्वतः फेसबुक पोस्टद्वारे (Facebook Post) याबाबत माहिती दिली आहे. अपघाताबाबत माहिती देताना ते फेसबुक पोस्ट म्हणाले आहेत आहेत की, चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं अपघात झाला. या अपघातात छातीला किरकोळ मार लागल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. 


Dhananjay Munde Accident: कसा झाला अपघात? 


धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे परळी शहरातील काही नागरिकांच्या वैयक्तिक भेटीगाठी घेत होते. त्यानंतर ते ग्रामीण भागात गेले आणि ग्रामीण भागातून साडेअकरा वाजता रात्री परळी शहरात आले. परळी शहरात आल्यानंतर ते आपल्या राहत्या घराकडे निघाले. 12:30 वाजता धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची त्यांची बीएमडब्ल्यू (BMW) त्यांच्या घराजवळ असलेल्या मौलाना आझाद चौकामध्ये आली. यावेळी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या गाडीची स्पीड चाळीस ते पन्नास असण्याची शक्यता आहे. यावेळी चालकाचा ताबा गाडीवरला सुटल्याने त्यांची गाडी मौलाना आझाद चौकाला जाऊन आदळली. या अपघातामध्ये बीएमडब्ल्यू कारचा पुढच्या भागाच मोठं नुकसान झालं आहे. अपघातानंतर लगेच मौलाना अब्दुल आझाद  चौकातून धनंजय मुंडे यांना दुसऱ्या गाडीने तिथून जवळ असलेल्या त्यांच्या घरी नेण्यात आलं होतं. त्यानंतर परळीतील डॉक्टरांनी त्यांना घरी जाऊन त्यांची तपासणी केली. धनंजय मुंडे यांच्या काही तपासण्या झाल्या, ज्यामध्ये त्यांच्या छातीमध्ये दोन ठिकाणी छोटेसे फॅक्चर झाल्याचे निदर्शनास आले. आता त्यांना एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईत आणण्यात आले आहे.


Dhananjay Munde Facebook: आपल्या फेसबुक पोस्टमध्ये काय म्हणाले धनंजय मुंडे? 


फेसबुक पोस्टमध्ये धनंजय मुंडे (Dhananjay Munde) म्हणाले आहेत की, ''मंगळवारी दिवसभर मतदारसंघातील कार्यक्रम व भेटी आटोपून परळीकडे परतताना रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास परळी शहरात माझ्या वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने छोटासा अपघात झाला आहे. माझ्या छातीला किरकोळ मार लागला असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. काळजी करण्यासारखे काही नाही, कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये.''


इतर महत्वाची बातमी: 


Mahavitaran Strike Called Off: मोठी बातमी! राज्यातील वीज कर्मचाऱ्यांचा संप मागे, थोड्याच वेळात वीज पुरवठा सुरळीत होणार