Mumbai : मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. इंजिनिअरिंग आणि इतर शिक्षणही मराठी भाषेतून करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे. येत्या काळात सर्व शिक्षण हे मराठीत करणार असल्याचे फडणवीस म्हणाले. 


मुंबईत ‘मराठी तितुका मेळवावा’ या विश्व मराठी संमेलनाचे (Vishwa Marathi Sammelan) आयोजन करण्यात आले होते.  संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी फडणवीस बोलत होते.  यावेळी केंद्रीय मंत्री पियुष गोयल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर उपस्थित  होते.


फडणवीस म्हणाले,"आम्ही आता इंजिनिअरिंग किंवा इतर शिक्षणदेखील मराठी भाषेतून करणार आहोत. मराठी भाषा ही ज्ञान भाषा करणार आहोत. मराठी नाट्य संस्कृतीची प्रगल्भता इतर कशात पाहता येत नाही. जगातील आयटीमध्ये मराठी माणसाला बोलबाला आहे. महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात पुढे होता. आता त्याला आणखी पुढे आणण्याचा प्रयत्न येत्या काळात करणार आहे. जगातील प्रत्येक खंडातील लोक या संमेलनात उपस्थित आहेत. मराठी भाषेला समृद्ध करण्याचं काम स्वातंत्र्यवीर सावकरांनी केलं. भारतीय भाषा जगवण्यासाठी ज्ञान भाषेत रुपांतर केलं पाहिजे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओळखल आहे.


मुंबईतील मराठी माणूस बाहेर जाता कामा नये : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, आपले सण-संस्कृती जोपासली पाहिजे. मराठी भाषिकांसाठी काय करावं लागेल ते करण्याची आमची तयारी आहे. आमचं सरकार आल्यानंतर सर्व सण सुरू करण्यात आले आहेत. मुंबईतील मराठी माणूस बाहेर जाता कामा नये यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. जे बाहेर गेले आहेत त्यांना मुंबईत आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावले जातील. मराठी भाषेचा आणि विज्ञानाचा जयघोष एकाचवेळी होत आहे. जी 20 अध्यक्षपद मिळालं हे फार मोठं आहे. मराठी माणूस जगभरात आहे ही आनंदाची बाब आहे. मुंबईतला मराठी टक्का घसरू देणार नाही". 


दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले,"सरकारच्या विरोधात बोलणाऱ्याला तुरुंगात पाठवणारं सरकार होतं. पण आता आम्ही सर्वांचं ऐकूण घेतो आणि काम करतो. तुरुंगात पाठवणाऱ्या सकरारची मुदत संपली आहे". 


संबंधित बातम्या


Flower Farmers : आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटलांनी घेतली फडणवीसांची भेट, प्लास्टिक फुलांवर बंदी घालण्याची मागणी