एक्स्प्लोर

मी मिम पाहिला, ज्यात राज ठाकरे शांतपणे झोपलेले आहेत; फडणवीसांकडून मनसेप्रमुखांची फिरकी, ओमराजेंसाठी शिंदेंची बॅटींग

2029 मध्ये अमित शाह हे स्वत: पंतप्रधान व्हायची तयारी करत आहेत. त्यामुळेच ठाकरे गटाचे सहा खासदार शिवसेना शिंदे गटात गेल्याचे मत राज ठाकरेंनी व्यक्त केले. यावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Devendra Fadnavis : शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदार फुटले आहेत. हे खासदार शिवसेना शिंदे गटाच प्रवेश करणार आहेत. याबाबत आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आले. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, लवकरच तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळेल. आम्ही ऑपरेशन अर्धवट करत नाही, याचा तुम्हाला अनुभव आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली. ऑपरेशन यशस्वी आहे आणि बॉडी एकदम सदृढ आहे. दरम्यान, 2029 मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे स्वत: पंतप्रधान व्हायची तयारी करत आहेत. त्यामुळेच ठाकरे गटाचे सहा खासदार हे थेट भाजपमध्ये (BJP) न जाता शिंदे गटात गेल्याचे वक्तव्य मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलं होतं. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची फिरकी घेतली.

नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?

आगामी लोकसभा निवडणुकीवेळी म्हणजे 2029 मध्ये अमित शाह हे स्वत: पंतप्रधान व्हायची तयारी करत आहेत. त्यामुळेच ठाकरे गटाचे सहा खासदार हे थेट भाजपमध्ये (BJP) न जाता शिंदे गटात गेले. या सगळ्यामागे अमित शाह (Amit Shah) यांना पंतप्रधान करण्याच्यादृष्टीने रणनीती आखण्यात आल्याचे वक्तव्य मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केले. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी काल एक मिम पाहिला, त्या मिममध्ये राज ठाकरे शांतपणे झोपले आहेत. त्या ठिकाणी लिहलंय की, मला शांतपणे झोप लागते कारण माझ्याकडे खासदारही नाही, आमदारही नाही, कोणी जाण्याचा प्रश्नच नाही असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांना लगावला.  

नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?

राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या 'ऑपरेशन टायगर'संदर्भातही भाष्य केले. अमित शाह यांचा ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतरच एकनाथ शिंदे यांनी'ऑपरेशन टायगर' राबवले होते. त्यानुसार ठाकरे गटातील संजय जाधव, संजय देशमुख, संजय दिना पाटील, भाऊसाहेब वाकचौरे, ओमराजे निंबाळकर आणि नागेश आष्टीकर पाटील या सहा खासदारांना एकनाथ शिंदे यांनी गळाला लावले होते. या सगळ्या घडामोडींवर भाष्य करताना राज ठाकरे यांनी एका वेगळ्याच पैलूकडे सर्वांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. राज ठाकरे यांनी म्हटले की, ठाकरे गटाचे जे खासदार फुटले, त्याबाबत माझा एक प्रश्न आहे. केंद्रात सत्ता कोणाची ? भारतात सत्ता कोणाची ? भाजपची ना, मग हे 6 खासदार भाजपमध्ये न जाता शिंदे गटात का गेले? यामागे एक कारण आहे. 2029 मध्ये अमित शाह हे स्वत: पंतप्रधान होण्याची तयारी करत आहेत. अन्यथा हे 6 खासदार भाजपमध्ये गेले असते, असे राज ठाकरे यांनी म्हटले.

भाजपमध्ये अंतर्गत ज्वालामुखी खदखदत आहे

सध्याच्या घडीला भाजपमध्ये अंतर्गत ज्वालामुखी खदखदत आहे. आतून सगळं पेटलेलं आहे. नरेंद्र मोदी असल्यामुळे सध्या सगळं शांत आहे. पण काहीजण बोलत आहेत की, येत्या काही दिवसांमध्ये केंद्रात आणि अनेक ठिकाणी गोंधळ होईल. त्यामुळे तयार व्हा, ज्यावेळी वेळ येईल तेव्हा तुम्ही जमिनीत पाय रोवून उभे राहिले पाहिजे, असा कानमंत्र राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिला. 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
नीट पेपरफुटी, ठाकरे बंधूंकडून मोर्चात एकत्र येण्याची तयारी; दुसरीकडे दंगलफेम अभिनेत्री आयशा खानला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं
नीट पेपरफुटी, ठाकरे बंधूंकडून मोर्चात एकत्र येण्याची तयारी; दुसरीकडे दंगलफेम अभिनेत्री आयशा खानला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं
सळसळतं रक्त थंड होऊ देऊ नका, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा व्हायलाच पाहिजे, आदित्य ठाकरे आक्रमक, 24 तारखेला शिवाजी पार्कवर एकत्रीत राष्ट्रगीत गायन करणार
सळसळतं रक्त थंड होऊ देऊ नका, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा व्हायलाच पाहिजे, आदित्य ठाकरे आक्रमक, 24 तारखेला शिवाजी पार्कवर एकत्रीत राष्ट्रगीत गायन करणार
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget