एक्स्प्लोर

'पेट्रोल-डिझेलची दरवाढ कुणाच्या हातात, हे लोकांना माहितीय', अजित पवारांचा फडणवीसांना टोला

राज्यात पेट्रोल डिझेलवरील कर कमी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केली होती. यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.

मुंबई : सध्या देशात पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरुन विरोधक केंद्र सरकारवर टीका करताना दिसत आहेत. त्यात राज्यात पेट्रोल डिझेलवरील कर कमी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केली होती. यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. अजित पवार म्हणाले की, केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले आहेत. त्याचं समर्थन करता येत नाही. त्यामुळे राज्य सरकारबद्दल फडणवीस असं वक्तव्य करत आहेत. पेट्रोल-डिझेलची दरवाढ कुणाच्या हातात असते हे आपल्या देशातील लोकांना माहित आहे. उलट केंद्र सरकारच्या अशा दरवाढीमुळे उद्या पेट्रोल 100 रुपये लिटर झालं तर आश्चर्य वाटून घेऊ नये. स्वतःचं अपयश लपवण्यासाठी फडणवीसांनी असं वक्तव्य केलं असणार, असा टोला अजित पवारांनी लगावला आहे.

वीज दरवाढीबाबत भाजपच्या उद्या होणाऱ्या आंदोलनाबाबत अजित पवार म्हणाले की, वीज दराबाबत राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. शेतकऱ्यांची 45 हजार कोटीची थकबाकी होती, त्यातील केवळ 15 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांनी भरायचे आहेत. असे 30 हजार कोटी रुपये माफ केले आहेत. वीज कंपन्या अडचणीत असतानाही 30 हजार कोटी रुपये माफ करून अडचणीत असलेल्या माणसाला राज्य सरकारने आधार दिलाय. त्यामुळे तोंडदाखल भाजप उद्या आंदोलन करतंय, असं पवार म्हणाले.

सेलिब्रेटींनी काय ट्विट करावं हा त्यांचा अधिकार सेलिब्रेटींनी काय ट्विट करावं हा त्यांचा अधिकार आहे. आपल्याला घटनेनं स्वतःचं मत मांडण्याचा अधिकार दिला आहे. त्याबद्दल आम्हाला टिपण्णी करण्याचं गरज नाही. उलट एवढं आंदोलन पेटललं असतानाही केंद्र सरकारने अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना काहीही दिलं नाही, असं अजित पवार म्हणाले.

काँग्रेसचा उपमुख्यमंत्रीपदासाठी प्रस्तावावर अजित पवार म्हणतात... काँग्रेसचा उपमुख्यमंत्रीपदासाठी प्रस्तावावर अजित पवार म्हणाले की, अशा बातम्यात काहीही तथ्य नसतं. महाविकास आघाडी एक वर्षापूर्वी अस्तित्वात आली तेव्हा सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे या तीनही नेत्यांनी एकत्र बसून निर्णय घेतलेले आहेत. त्या संपूर्ण निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं काम आम्ही करतोय. प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा निर्णय हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यात बाकीच्यांनी चर्चा करण्याचं कारण नाही, असं पवार म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Radheshyam Mopalwar Government Project: माजी आयएएस अधिकाऱ्याच्या कंपनीला राज्य सरकारकडून 200 कोटींचं कंत्राट, गेटवे ऑफ इंडिया परिसरातील रेडिओ क्लब प्रवासी जेट्टी प्रकल्पाला अखेर हिरवा कंदील
माजी आयएएस अधिकाऱ्याच्या कंपनीला राज्य सरकारकडून 200 कोटींचं कंत्राट, गेटवे ऑफ इंडिया परिसरातील रेडिओ क्लब प्रवासी जेट्टी प्रकल्पाला अखेर हिरवा कंदील
Devendra Fadnavis Gen Z: नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
Mumbai Crime Vikhroli Parksite: मुंबईच्या विक्रोळीत तीन भावांमध्ये घरात गाणी लावण्यावरुन वाद, कुटुंबावर धारदार शस्त्राने वार, दोघांचा मृत्यू
मुंबईच्या विक्रोळीत तीन भावांमध्ये गाणी लावण्यावरुन वाद, कुटुंबावर धारदार शस्त्राने वार, दोघांचा मृत्यू
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune RTO: पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
Pune Crime: येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
Hindu Religion: देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
Pune Hinjewadi IT Park: हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
Ashok Shinde On Alka Kubal: 'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
Devendra Fadnavis Gen Z: नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
Cockroach Janta Party : 'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
Maharashtra Live blog updates: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी आज लॉटरी निघणार, अर्जदारांची धाकधूक वाढली
Maharashtra Live blog updates: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी आज लॉटरी निघणार, अर्जदारांची धाकधूक वाढली
Embed widget