मुंबई : उंचीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मुंबई विमानतळाजवळील 112 इमारती पाडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने महापालिका प्रशासनाला दिले आहेत. तसंच या इमारतींना नियमबाह्य एनओसी देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देशही हायकोर्टाने दिले आहे.


मुंबई विमानतळ परिसरातील 112 इमारतींची उंची निर्धारित उंचीपेक्षा जास्त आहे. या इमारतीमुळे लँडिंग किंवा टेक ऑफ करताना विमानाला अपघात होऊन हजारो लोकांचे प्राण धोक्यात येऊ शकतात, असा दावा करत अॅड. यशवंत शेणॉय यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहीत याचिका दाखल केली आहे.

या याचिकेवर न्यायमूर्ती विद्यासागर कानडे आणि न्यायमूर्ती सी वी भडंग यांच्या खंडपीठासमोर बुधवारी सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान आधीच नोटीस बजावलेल्या 112 इमारती पाडण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत.

गेल्यावर्षी हायकोर्टाच्या आदेशानंतर महापालिकेने सुनीता नाम इमारतीचे वरचे मजले पाडले होते. या याचिकेवरील पुढील सुनावणी आज होणार आहे.