एक्स्प्लोर

बेस्टच्या दर कपातीचा निर्णय लांबणीवर, स्वस्त प्रवासासाठी मुंबईकरांना वाट पाहावी लागणार

बेस्ट समितीच्या बैठकीत बेस्ट दर कपातीच्या प्रस्तावाचा निर्णय तूर्तास पुढे ढकलण्यात आला आहे. यामुळे मुंबईकरांना स्वस्त बेस्ट बस प्रवासासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

मुंबई : बेस्ट समितीच्या बैठकीत बेस्ट दर कपातीच्या प्रस्तावाचा निर्णय तूर्तास पुढे ढकलण्यात आला आहे. यामुळे मुंबईकरांना स्वस्त बेस्ट बस प्रवासासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. आज बेस्ट समितीच्या बैठकीत बेस्ट दर कमी करण्यासाठी प्रस्ताव मांडण्यात आला. परंतु घाईघाईत प्रस्ताव सादर न करता सविस्तर प्रस्ताव बेस्ट समितीत मांडण्यात यावा, अशी मागणी बेस्ट समिती सदस्य सुनिल गणाचार्य यांनी केली. याला सर्व सदस्यांनी पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर हा प्रस्ताव मंजुरीसाठी पुढील बैठकीत राखून ठेवण्यात आला. बेस्ट कामगार युनियनने सामंजस्य करार केल्यानंतर बेस्ट कामगारांचा प्रश्न सुटला. मात्र मुंबईकरांचा सुलभ व कमी दरातील प्रवासाचा प्रश्न बारगळला. बेस्ट कमी दरात सेवा देत आहे, त्याचे स्वागत केले आहे. मात्र त्यात काही त्रुटी होत्या. या त्रुटींबाबत आज बेस्ट समितीच्या बैठकीत स्पष्टीकरण मागितले आहे. 3 महिन्यात किती बस येतील, त्या डेपोत कधी कार्यरत होतील. याबाबत सविस्तर माहितीसह बेस्ट समितीत प्रस्ताव आणावा, त्यानंतर त्याला आम्ही मंजुरी देऊ, असे बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी सांगितले. बेस्ट दर कपातीच्या प्रस्तावाला आमचा विरोध नाही. परंतु बेस्टकडे बसेसची संख्या अपुरी आहे. त्यामुळे बेस्ट दर कमी करण्यापूर्वी नव्या बेस्ट बस ताफ्यात आणाव्यात. तसेच बेस्टकडून ज्या 1200 नव्या चालकांची भरती केली जाणार आहे, त्यांना बेस्टच्या नियमांचे प्रशिक्षण द्यावे. त्यानंतर त्यांना सेवेत आणावे, अशी मागणी मांडण्यात आली आहे. तसेच या बस कोणत्या डेपोतून कशा पद्धतीने सोडणार याची माहिती देऊन प्रस्ताव आणावा, अशी आम्ही मागणी केल्याचे बेस्ट समिती सदस्य सुनील गणाचार्य यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

Sachin Vaze : सचिन वाझेचा कारागृहातील मुक्काम वाढला; जामीन अर्जावर स्थगिती, पुढची सुनावणी 7 ऑक्टोबरला
सचिन वाझेचा कारागृहातील मुक्काम वाढला; जामीन अर्जावर स्थगिती, पुढची सुनावणी 7 ऑक्टोबरला
Maharashtra Election Commission S. Chockalingam: SIR नोंदणी करताना व्हॉट्सॲपवरील पुरावे ग्राह्य धरा; एस. चोक्कलिंगम यांचे अधिकाऱ्यांना आदेश
SIR नोंदणी करताना व्हॉट्सॲपवरील पुरावे ग्राह्य धरा; एस. चोक्कलिंगम यांचे अधिकाऱ्यांना आदेश
Maharashtra Drought Farmers: दुष्काळात कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांच्या दारात अजिबात फिरकायचं नाही, राज्य सरकारचा महत्त्वाचा आदेश
दुष्काळात कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांच्या दारात अजिबात फिरकायचं नाही, राज्य सरकारचा महत्त्वाचा आदेश
Maha Rozgar Melava: महाराष्ट्रातील तरुणांना आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार; महारोजगार मेळाव्याचा कोकण व नाशिक विभागात शुभारंभ
महाराष्ट्रातील तरुणांना आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार; महारोजगार मेळाव्याचा कोकण व नाशिक विभागात शुभारंभ

व्हिडीओ

Thackeray Congress on EC : आयोगाविरोधात थोपटले दंड, विरोधकांची तयारी प्रचंड | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case : टॅटू, चॅटिंग, मर्डर; आरोपांचा डोंगर | Special Report ABP Majha
Raj Thackeray Rahul Gandhi : राज-राहुल संपर्क? चर्चेत राऊतांचा तर्क Special Report
Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Goverment On Agniveer: ना परीक्षा, ना ट्रेनिंग, कुठलीही अट नाही; अग्निवीरांना पोलिसांच्या पदावर घेणार, महाराष्ट्र सरकारचा सगळ्यात मोठा निर्णय
ना परीक्षा, ना ट्रेनिंग, कुठलीही अट नाही; अग्निवीरांना पोलिसांच्या पदावर घेणार, महाराष्ट्र सरकारचा सगळ्यात मोठा निर्णय
Manoj Jarange Defender Car : मनोज जरांगेंनी वापरलेली 'ती' वादग्रस्त डिफेंडर गाडी सोलापूर जिल्ह्यात परतली; गावोगावी गाडीची पूजा, नागरिक म्हणाले, 'गाडीमध्ये ज्या सिटावरती हे आमचं दैवत बसलं होतं....'
मनोज जरांगेंनी वापरलेली 'ती' वादग्रस्त डिफेंडर गाडी सोलापूर जिल्ह्यात परतली; गावोगावी गाडीची पूजा, नागरिक म्हणाले, 'गाडीमध्ये ज्या सिटावरती हे आमचं दैवत बसलं होतं....'
Thane Crime Shivsena UBT Pradeep Purnekar Death Case: प्रदीप पूर्णेकरांची शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट, म्हणाले, 'एक तर आपला अध्याय संपेल किंवा नवीन अध्याय सुरू होईल'
प्रदीप पूर्णेकरांची शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट, म्हणाले, 'एक तर आपला अध्याय संपेल किंवा नवीन अध्याय सुरू होईल'
Thane Crime Pradeep Purnekar Death Case: प्रदीप पूर्णेकरांच्या मृतदेहाचा CT स्कॅन रिपोर्ट समोर, एक मानेतून आरपार, दुसरी गोळी छातीत अडकली; थरकाप उडवणारा रिपोर्ट
प्रदीप पूर्णेकरांच्या मृतदेहाचा CT स्कॅन रिपोर्ट समोर, एक मानेतून आरपार, दुसरी गोळी छातीत अडकली; थरकाप उडवणारा रिपोर्ट
Sanjay Raut on Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकरांना का संपवलं? संजय राऊतांनी सगळंचं काढलं, अमली पदार्थ, बिल्डर अन् वाद, पोलिस आयुक्तासह गृहविभागावर व्यक्त केला संताप
प्रदीप पूर्णेकरांना का संपवलं? संजय राऊतांनी सगळंचं काढलं, अमली पदार्थ, बिल्डर अन् वाद, पोलिस आयुक्तासह गृहविभागावर व्यक्त केला संताप
Thane Shivsena UBT Pradeep Purnekar Death Case: आरोपी एकत्र उभे होते आणि मला बघून ते दचकले; वडील प्रदीप पूर्णेकर यांच्या मृत्यूनंतर मुलाची धक्कादायक माहिती
आरोपी एकत्र उभे होते आणि मला बघून ते दचकले; वडील प्रदीप पूर्णेकर यांच्या मृत्यूनंतर मुलाची धक्कादायक माहिती
Dilip Khedkar : दिलीप खेडकरांच्या घरी एसीबीनं पहाटेच टाकली धाड; 30-40 अधिकारी-कर्मचारी पोहोचले, 13 कोटींची बेहिशेबी संपत्ती, काय-काय सापडलं?
दिलीप खेडकरांच्या घरी एसीबीनं पहाटेच टाकली धाड; 30-40 अधिकारी-कर्मचारी पोहोचले, 13 कोटींची बेहिशेबी संपत्ती, काय-काय सापडलं?
Pune Crime News: जेजुरी देवस्थानचे विश्वस्त राजेंद्र खेडेकरला अटक; पुणे पालिकेत नोकरीचं आमिष; पावणेतीन कोटींचा गंडा, बनावट शिक्के, सह्या, बोगस जॉईनिंग लेटर अन् पगारही दिला
जेजुरी देवस्थानचे विश्वस्त राजेंद्र खेडेकरला अटक; पुणे पालिकेत नोकरीचं आमिष; पावणेतीन कोटींचा गंडा, बनावट शिक्के, सह्या, बोगस जॉईनिंग लेटर अन् पगारही दिला
Embed widget