एक्स्प्लोर

मुंबईची पूलकोंडी, धोकादायक 34 पुलांपैकी 26 पूल वाहतुकीसाठी बंद

मुंबईत वाहतुकीसाठी महत्वाचे असणारे 34 पूल पालिका आणि रेल्वे प्रशासनाचे धोकादायक ठरवले आहेत. यातील तब्बल 26 पूल बंद असल्याने मुंबईकरांना मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागत आहे.

मुंबई : मुंबईत वाहतुकीसाठी महत्वाचे असणारे 34 पूल पालिका आणि रेल्वे प्रशासनाचे धोकादायक ठरवले आहेत. प्रशासनाकडून हे पूल वाहतूकीसाठी पूर्णत: किंवा अंशत: बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबईत वाहतुकीची कोंडी वाढली आहे. यातच पावसाळा तोंडावर असताना हे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने एका पावसाने मुंबईची होणारी कोंडी पाहता पावसात मुंबईकरांना मोठ्या गैरसोईला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात मुंबईतील एकंदर वाहतुकीचा दरवर्षीचा अनुभव पाहता यंदा पूलबंदीमुळे मुंबईकरांचे अधिकच हाल होणार आहेत. करी रोड, चिंचपोकळी, घाटकोपर, लोअर परळ, सायन, खार, विलेपार्ले अशा अनेक ठिकाणी रहदारीच्या पुलांचा वापर बंद किंवा मर्यादित केल्याने पावसाने जोर धरताच वाहतुकीचा बोजवारा उडण्याची भीती व्यक्त होत आहे. मुंबई महापालिका अखत्यारीत येणाऱ्या 29 आणि रेल्वेच्या अखत्यारीत येणाऱ्या 5 धोकादायक पुलांपैकी 13 पूल बंद करण्यात आले आहेत. तसंच 8 पूल पाडण्यात आले आहेत. उरलेले 8 पूल सध्या वाहतुकीसाठी सुरु असले तरी कधीही ते बंद केले जाऊ शकतात. यामुळे पूलबंदीमुळे आधीच मुंबईची कोंडी वाढली आहे. मात्र पावसाळ्यात मुंबईत ठिकठिकाणी तुंबणारं पाणी आणि त्याचा वाहतुकीवर होणारा परिणाम पाहता येत्या पावसाळ्यात मुंबईकरांचे हाल होणार आहेत. मुंबईतील पुलांची सद्यस्थिती डिलाइल रोड पूल वाहतुकीसाठी बंद लोअर परळ पुलाचं पाडकाम सुरु करी रोड पुलावरुन अवजड वाहतूक बंद घाटकोपर पूर्व-पश्चिम जोडणारा पूल बंद सायन पुलावर अवजड वाहनांना वाहतुकीस मनाई घाटकोपर-अंधेरी जोडरस्त्यावरील पूल वाहतुकीसाठी बंद कुर्ला स्थानकातील दोन पूल बंद दादर स्थानकातील पादचारी पूल बंद माटुंगा आणि शीव स्थानकांदरम्यान असलेला पादचारी पूल बंद घाटकोपर स्थानकातील पादचारी पुलाच्या पायऱ्यांची दुरुस्ती सुरु मरिन लाइन्सचा पादचारी पूल पाडला चर्नी रोड पूल पादचाऱ्यांसाठी बंद पश्चिम रेल्वेवरील खार स्थानकास जोडणारा पूल दुरुस्तीसाठी बंद विलेपार्ले स्थानकातील पादचारी पूलाचे दोन भाग दुरुस्तीसाठी बंद मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकातील पूल पायऱ्या दुरुस्तीसाठी बंद

महत्त्वाच्या बातम्या

शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकाच्या कंत्राटात चुलत भावानेच पैसे खाल्ले, ओंबळेंच्या मुलीचा आरोप 
शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकाच्या कंत्राटात चुलत भावानेच पैसे खाल्ले, ओंबळेंच्या मुलीचा आरोप 
Cabinet Decision : मोठी बातमी! राज्यातील 33 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोफत धान्य, 3 किलो तांदूळ आणि 2 किलो गहू वाटप, शासनाचा मोठा निर्णय
राज्यातील 33 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोफत धान्य, 3 किलो तांदूळ आणि 2 किलो गहू वाटप, शासनाचा मोठा निर्णय
दुपारी पुण्यात, संध्याकाळी मुंबईत, गोळीबाराच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला, माहीम परिसरात सोन्याच्या दुकानावर गोळीबार झाल्यानं खळबळ
दुपारी पुण्यात, संध्याकाळी मुंबईत, गोळीबाराच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला, माहीम परिसरात सोन्याच्या दुकानावर गोळीबार झाल्यानं खळबळ
मोठी बातमी! SIT चं पथक मनोज जरांगे पाटलांच्या घरी दाखल, चौकशी केली जाणार, नेमकं प्रकरण काय? 
मोठी बातमी! SIT चं पथक मनोज जरांगे पाटलांच्या घरी दाखल, चौकशी केली जाणार, नेमकं प्रकरण काय? 

व्हिडीओ

Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक
Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate : सोने चांदीच्या दरात आज मोठी घसरण, MCX वर सोने 1 लाख 20 हजार रुपयांच्या खाली पोहोचलं, चांदीच्या दरात 8000 रुपयांची घसरण
Gold Rate : सोने चांदीच्या दरात आज मोठी घसरण, MCX वर सोने 1 लाख 20 हजार रुपयांच्या खाली पोहोचलं
Donald Trump : अमेरिकेचा भारतासह एकूण 14 देशांवर नव्यानं 25 टक्के टॅरिफ लादण्याचा इशारा, अखेर भारतानं ठाम प्रत्युत्तर दिलं...
अमेरिकेचा भारतासह एकूण 14 देशांवर नव्यानं 25 टक्के टॅरिफ लादण्याचा इशारा, अखेर भारतानं ठाम प्रत्युत्तर दिलं...
Pune Bopdev Accident : पुण्याच्या बोपदेव घाटातून उतारानं येणारा टेम्पो काळ बनून आला, तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू, दोन जण जखमी 
पुण्याच्या बोपदेव घाटातून उतारानं येणारा टेम्पो काळ बनून आला, तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू, दोन जण जखमी 
Rajasthan : राजस्थानात 24 जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेसचा अध्यक्ष, मुख्यमंत्री भजनलाल शर्मांच्या जिल्ह्यात भाजप उमेदवाराचा पराभव  
राजस्थानमध्ये 37 पैकी 24 जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेसचा अध्यक्ष, मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात भाजपचा पराभव
Pune Firing Case : दोन सूत्रधार पुण्यातून तर तीन हल्लेखोर दौंडमध्ये गजाआड, पुणे कोर्ट गोळीबार प्रकरणात 5 आरोपींना अटक; क्राईम ब्रँचची कारवाई
दोन सूत्रधार पुण्यातून तर तीन हल्लेखोर दौंडमध्ये गजाआड, पुणे कोर्ट गोळीबार प्रकरणात 5 आरोपींना अटक; क्राईम ब्रँचची कारवाई
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2026 | बुधवार
Pune Crime : मंदार किवळेची प्रकृती क्रिटिकल, पुढचे 72 तास सांगता येणार नाही; कोर्टाबाहेर गोळीबार झालेला तरूण वाचणार की...? ससूनचे डीन जाधवांनी दिली हेल्थ अपडेट 
मंदार किवळेची प्रकृती क्रिटिकल, पुढचे 72 तास सांगता येणार नाही; कोर्टाबाहेर गोळीबार झालेला तरूण वाचणार की...? ससूनचे डीन जाधवांनी दिली हेल्थ अपडेट 
Sunetra Pawar on Pune Firing : 'आरोपींना सोडणार नाही, पुणेकरांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड नाही'; कोर्टाबाहेरील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवारांची पहिली मोठी प्रतिक्रिया
'आरोपींना सोडणार नाही, पुणेकरांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड नाही'; कोर्टाबाहेरील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवारांची पहिली मोठी प्रतिक्रिया
Embed widget