पनवेलमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी, जेएनीटी बंदरासाठी सरकारने जमीन संपादनाचे काम सुरु केले आहे. त्यामुळे जमिनीच्या मोबदल्यात पनवेलमधील अनेक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पैसे मिळाले आहेत. जर पनवेलमध्ये डान्स बार पुन्हा सुरु झाले तर, अनेक लोक जमिनींच्या मोबदल्यात मिळालेला पैसा बारबालांवर आणि मद्यपानावर उडवतील. असे झाल्यास येथील शेतकऱ्यांकडे ना जमीन राहील, ना त्या बदल्यात मिळालेला पैसा, अशी भिती पनवेलमधील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
डान्स बारमुळे पनवेल मधील स्थानिक गावकऱ्यांना त्रासाला सामोरे जाव लागत होते. आता पुन्हा एकदा डान्स बार सुरु झाल्यास पनवेलमधील ग्रामस्थांना, गावांमधील महिलांना त्रास सहन करावा लागणार आहे. आंबट शौकीन बारबाला समजून गावातील महिलांना छेडतात, असे येथील गावकऱ्यांनी सांगितले.