एक्स्प्लोर
मुंबईत पेट्रोल पंपावर सिलेंडरचा स्फोट, तिघे जखमी
या दुर्घटनेत रिक्षांचा अक्षरश: चक्काचूर झाला तर जखमी रिक्षाचालकांची प्रकृती गंभीर आहे.

मुंबई : मुंबईतील कांदिवलीमध्ये पेट्रोल पंपावर सीएनजी सिलेंडरचा स्फोट झाला. या घटनेत तीन जण जखमी झाले असून त्यात दोन रिक्षाचालकांचा समावेश आहे. जखमींना उपचारांसाठी तुंगा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कांदिवली पश्चिम इथे मिलाप पेट्रोल पंपावर आज सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली. सकाळी गॅस भरण्यासाठी या पेट्रोल पंपावर रिक्षांची रांग लागली होती. यावेळी एका रिक्षात सीएनजी गॅस भरताना स्फोट झाला, ज्यात दोन रिक्षाचालक आणि पेट्रोल पंपावरील एक कर्मचारी जखमी झाले. या दुर्घटनेत रिक्षांचा अक्षरश: चक्काचूर झाला तर पेट्रोल पंपाचंही मोठं नुकसान झालं. तसंच जखमी रिक्षाचालकांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, पेट्रोल पंपावरील पेट्रोल आणि डिझेल सेक्शन सध्या बंद करण्यात आलं आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. मर्यादेपेक्षा वजनापेक्षा जास्त गॅस भरल्याने हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र स्फोट नेमका कसा झाला याचा तपास कांदिवली पोलीस करत आहेत.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक























