दक्षिण मुंबईतील काळा घोडा परिसर हा शांतता क्षेत्र म्हणून घोषित झाल्यानंतर काळा घोडा महोत्सवांतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम काही वर्षांपासून चर्चगेट स्टेशनसमोरील क्रॉस मैदानावर घेतले जातात. मात्र, हा परिसर शांतता क्षेत्र म्हणून घोषित केल्यामुळे मैदानावर कोणताही कार्यक्रम आयोजित करण्यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे. त्यासाठी यंदाही काळा घोडा महोत्सवाच्या आयोजकांनी न्यायालयाच्या परवानगीसाठी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर नुकतीच न्यायमूर्ती एस. काथावाला आणि न्यायमूर्ती बी.पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा, याचिकाकर्त्यांची बाजू ऐकून आणि जिल्ह्याधिकाऱ्यांनी १३ जानेवारीला यासंदर्भात दाखल केलेल्या ना हरकत प्रमाणपत्राची दखल घेत हायकोर्टानं हे आदेश दिले आहेत.
विदर्भातील मामा-भाचे यात्रा; नववर्षाच्या पहिल्या दिवशी घनदाट जंगलात भरतो उत्सव
तसेच इथं होणारे मनोरंजनात्मक आणि सामाजिक कार्यक्रम हे सर्व सामान्यांसाठीही खुले ठेवण्यात यावेत, त्यासाठी कोणतंही व्यावसायिक शुल्क आकारण्यात येऊ नये. या निर्देशांचंही पालन होईल अशी लेखी हमी आयोजकांना न्यायालयात सादर करण्याचे आदेश देत हायकोर्टानं .यासंदर्भातील सुनावणी 11 फेब्रुवारीपर्यंत तहकूब केली आहे.
काळा घोडा महोत्सव -
काळा घोडा महोत्सवाचं सगळ्यात मोठं आकर्षण असतं लोकनत्य आणि विविध शास्त्रीय नत्यकला. महोत्सवाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे भरणारं प्रदर्शन. विविध प्रांतातील कपडे, दागिने, हातमागाच्या वस्तू यांनी हा परिसर फुलून जातो. काळा घोडाच्या निमित्ताने अनेक कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी मोठी संधी असते. चित्रकला, फोटोग्राफी, कलात्मक वस्तू आपलं लक्ष वेधून घेतात. या कलाकृतींतून काही संदेशही देण्यात आले आहेत. दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक वास्तूंच्या साक्षीनं हा कलेचा उत्सव पाहण्यासाठी मुंबईसह भारतातीलच नाही; तर जगभरातून रसिक येतात. पुढचा आठवडाभर कलेच्या उपासकांसह रसिकांसाठीही ही मोठी पर्वणी असणार आहे.
Mann Deshi Mahotsav | रवींद्र नाट्य मंदिर परिसरात माणदेशी महोत्सवाचं आयोजन | मुंबई | ABP Majha