एक्स्प्लोर

CSMT : एकाच प्लॅटफॉर्मवर दोन लोकल आमनेसामने, सीएसएमटी स्टेशन मास्तर निलंबित, रेल्वे प्रशासनाची कारवाई

Mumbai Local Train Disruption : सीएसएमटी स्थानकात दोन लोकल आमनेसामने आल्याच्या गंभीर घटनेनंतर मध्य रेल्वेने स्टेशन मास्तरवर निलंबनाची कारवाई केली आहे.

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT Station) येथे दोन लोकल एकाच ट्रॅकवर आमनेसामने आल्याच्या गंभीर घटनेनंतर मध्य रेल्वे प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी संबंधित स्टेशन मास्तरला निलंबित करण्यात आलं आहे. मंगळवारी दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास घडलेली ही घटना अत्यंत गंभीर मानली जात आहे. यावेळी मोठा अपघात टळल्यामुळे रेल्वे प्रशासन सतर्क झालं आहे. या प्रकारामुळे मोठा अनर्थ होऊ शकला असता, हे लक्षात घेऊन तातडीने ही कारवाई करण्यात आली.

CSMT Railway Incident : दोन लोकल आमनेसामने

बदलापूरहून येणारी फास्ट लोकल (Badlapur Fast Local) नियोजित 4 नंबर प्लॅटफॉर्मऐवजी अचानक 5 नंबर प्लॅटफॉर्मकडे वळली. मात्र त्या प्लॅटफॉर्मवर आधीच एक लोकल उभी होती. समोरच लोकल असल्याचे लक्षात येताच मोटरमनने तात्काळ ब्रेक लावले. दोन्ही गाड्यांमध्ये 120 मीटर अंतर राहिले होते. मात्र मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली.

Railway Action : स्टेशन मास्तरवर निलंबन

या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने जबाबदारी निश्चित करत संबंधित स्टेशन मास्तरवर निलंबनाची कारवाई केली. सुरक्षेच्या दृष्टीने ही घटना अत्यंत गंभीर मानली जात आहे. रेल्वेच्या सिग्नल आणि ट्रॅक व्यवस्थापनात झालेल्या त्रुटीमुळे हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

Train Disruption : लोकल वाहतूक विस्कळीत

घटनेनंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बदलापूरहून आलेली लोकल मागे घेण्यात आली. तसेच प्लॅटफॉर्मवरील दुसरी लोकल दुसऱ्या ट्रॅकवरून पुढे पाठवण्यात आली. या प्रकारामुळे सीएसएमटी स्थानकावरील 5 ते 8 क्रमांकाचे प्लॅटफॉर्म काही काळ बंद ठेवण्यात आले. या घटनेमुळे दुपारी 3.18 पासून लोकल वाहतूक विस्कळीत झाली होती.

Technical Failure : यंत्रणेत बिघाडाचा संशय

तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारची घटना सहसा घडत नाही. सिग्नल प्रणाली किंवा ट्रॅक कंट्रोल यंत्रणेत बिघाड झाल्यासच अशी परिस्थिती निर्माण होते. म्हणूनच या प्रकरणात तांत्रिक त्रुटीचा कोन तपासला जात आहे.

Series of Issues : एका दिवसात तिसरा बिघाड

महत्त्वाचं म्हणजे, बुधवारी दिवसभरात रेल्वे व्यवस्थेत हा तिसरा बिघाड ठरला आहे. पहाटे खर्डी (Khardi Station) येथे घेतलेला ब्लॉक नियोजित वेळेपेक्षा अधिक काळ चालला. त्यानंतर डोंबिवली (Dombivli Station) येथेही पूर्वसूचना न देता ब्लॉक घेण्यात आल्याने लोकल सेवा उशिराने सुरू होती.

Passenger Impact : प्रवाशांचे हाल

या सलग बिघाडांमुळे लोकल सेवा पूर्णपणे कोलमडली. प्रवाशांना प्रचंड गर्दी आणि विलंबाचा सामना करावा लागला. सीएसएमटीतील घटनेमुळे वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत झाले असून रेल्वे प्रशासनावर प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

ही बातमी वाचा:

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुनावणी
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
CM Devendra Fadnavis Maharashtra Government: मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Embed widget