Mumbai : मुंबई मेरी जान... मुंबई म्हटलं की गजबजलेले रस्ते, गजबजलेल्या बस आणि गजबजलेली रेल्वे स्थानके आलीच. लाखो मुंबईकर दररोज धक्काधक्कीचा प्रवास करत असतात. दरम्यान मुंबईतील वाढती गर्दी पाहता गर्दीच्या स्थानकांमध्ये आता एकमजली स्टेशन तयार करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी 947 कोटी रुपयांची पुनर्विकास योजना मंजूर करण्यात आली असून पुढील 16 महिन्यांच्या आत हे काम पूर्ण होणार आहे. गर्दीची आणि गजबजलेली मुंबईतील प्रमुख 19 रेल्वे स्थानकांचा या प्रकल्पाअंतर्गत पुर्नविकास केला जाणार आहे. 


947 कोटींचा  हा पुनर्विकास प्रकल्प


मुंबई रेल्वे विकास महामंडळाने सध्याच्या वाहतुकीला अडथळा न आणता, दिलेल्या जागेत जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी प्रत्येक रेल्वे स्थानकासाठी तपशीलवार आराखडा तयार करून कार्यादेश देण्याचे आवाहन केले आहे. मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प 3A चा एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट लिंक - POS अंतर्गत 947 कोटींचा  हा पुनर्विकास प्रकल्प आहे.


मुंबईतील 19 रेल्वे स्थानकांचा पुर्नविकास


या प्रकल्पाअंतर्गत 19 रेल्वे स्थानकांचा पुर्नविकास करण्यात येणार आहे. यामध्ये मध्य रेल्वेवरील घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, डोंबिवली, नेरळ, शहाड, कसारा, जीटीबीएन, चेंबूर, गोवंडी, मानखुर्द या 12 स्थानकांचा समावेश आहे. तर पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल, सांताक्रुझ, कांदिवली, मीरा रोड, भाईंदर, वसई आणि नालासोपारा या सात स्थानकांचा समावेश आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha