Viral Video : उंदीर आणि मांजरीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. मांजरी अनेकदा उंदरांची शिकार करताना दिसतात. ज्यासाठी मांजरी अनेक वेळा खटपट करताना दिसतात. अलीकडेच, सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये बराच वेळ शिकारीसाठी घात धरून बसलेल्या एक मांजरीची चांगलीच फजिती होते.


उंदीर घरात घुसून खूप नुकसान करतात. कधी उंदीर महागडे कपडे कुरतडताना दिसतात तर कधी मालाचे नुकसान करताना दिसतात. यामुळे उंदरांवर उपाय म्हणून काही लोक घरात मांजर पाळतात. प्रत्येक कोपऱ्यातून मांजरी आपली शिकार उंदाराला काढून फस्त करताना अनेकदा दिसून येते.






 


सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर खरतर तुम्हाला हसू आवरणार नाही. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, मांजर घरातील एका मोठ्या टीव्हीसमोर बसलेली आहे, यावेळी टीव्हीवर सुरु असलेल्या एका कार्यक्रमामध्ये उंदीर दाखवण्यात आला आहे. टिव्हीतील उंदराला पाहून मांजराची फजिती होते. उंदराला पाहून मांजर शिकार करण्याची तयारी करत घात धरून बसते आणि उंदीर जवळ येण्याची वाट पाहते.


व्हिडीओमध्ये दिसत आहे की, टिव्हीमध्ये दिसणारा उंदीर मांजरीजवळ येताच मांजर त्याची शिकार करण्यासाठी उडी मारते. यावेळी मांजर टीव्हीवर आदळते आणि खाली पडते. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी हसू आवरत नाही आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्याला पाहून यूजर्सही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत  आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha