PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 एप्रिल रोजी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. 'परीक्षा पे चर्चा'चा हा पाचवा कार्यक्रम असेल. या कार्यक्रमाबाबत शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत महत्त्वाची माहिती दिली. 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात पंतप्रधान मोदी देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधतील.
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले आहे की, 'कोरोना महामारीनंतर पूर्ण परीक्षा घेतल्या जात आहेत. त्यामुळे अशा कार्यक्रमांनी मुले दबावातून मुक्त होतात.'
देशभरातील हजार विद्यार्थी होणार सहभागी
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले की, 'परीक्षा पे चर्चा कार्यक्रम 1 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर आयोजित केला जाणार आहे. परीक्षा पे चर्चाचा हा पाचवा कार्यक्रम असेल. या कार्यक्रमामध्ये इयत्ता 9वी ते 12वी पर्यंतचे 1 हजार विद्यार्थी सहभागी होतील.' प्रधान पुढे म्हणाले की, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि हरियाणातील सरकारी आणि खाजगी शाळांमधील विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी होतील. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपणही केले जाणार आहे.
कार्यक्रमासाठी विशेष व्यवस्था
यावेळी भारताचे सर्व राज्यपाल राजभवनात विद्यार्थी आणि शिक्षकांसोबत परिक्षा पे चर्चा कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. शिक्षण मंत्र्यांनी माहिती दिली की, भारतातील सर्व राज्यपाल राजभवनात विद्यार्थी आणि शिक्षकांसोबत सहभागी होणार आहेत. केंद्रीय उच्च शैक्षणिक संस्थांमध्येही हा कार्यक्रम आयोजित केला जाईल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Bharat Band : भारत बंदचा दुसरा दिवस, पहिल्या दिवशी काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत; आरोग्य सेवांवर परिणाम नाही
- Bengal Assembly : बंगाल विधानसभेत गोंधळ, भाजप आणि तृणमूल आमदारांमध्ये हाणामारी, एकमेकांचे कपडे फाडले
- Amaranth Yatra : 30 जूनपासून सुरू होणार अमरनाथ यात्रा, 43 दिवस चालणार, कोरोनामुळे यात्रा दोन वर्षे होती रद्द
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha