Mumbai Corona Update : मुंबईत आज नव्याने 52 कोरोनारुग्ण(Mumbai Corona Update) आढळले आहेत. कोरोनारुग्णांची संख्या मागील काही दिवसांपासून 50 च्या जवळपास आढळत आहे. आज नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या देखील 309 इतकी झाली आहे. याशिवाय मुंबई पालिका क्षेत्रात (BMC) आज एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.

      


मुंबई पालिका क्षेत्रात 52 कोरोनाबाधित आढळले असून आसपासच्या क्षेत्राचा विचार करता, ठाण्यात चार, ठाणे पालिका क्षेत्रात तीन, नवी मुंबईत दोन, मीरा-भाईंदर, पालघर, वसई-विरार, रायगड, पनवेल या क्षेत्रात प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. याशिवाय भिवंडी-निजामपूर पालिका क्षेत्रात चार कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.    


राज्यात 90 नवे कोरोनाबाधित


राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत  (Corona Update) चढ उतार होत असल्याचे चित्र असून  आज राज्यात केवळ 113  रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यातील  ॲक्टिव्ह रुग्णसंख्या देखील  एक हजारांखाली आली आहे. राज्यात सध्या 714 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. आज राज्यात 41 रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच गेल्या चोवीस तासात चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 127 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात आज चार कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.87 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77,26, 790  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के झाले आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या: 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha