Mumbai Corona Update : मागील काही दिवसांत वाढत असलेली मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या स्थिर झाली होती. आता मुंबईतील रुग्णंसख्या कमी होत असल्याची चिन्हे आहेट. शुक्रवारी आणि शनिवारी मुंबईत अनुक्रमे 202 आणि 201 रुग्णांची नोंद झाली होती. रविवारी यामध्ये आणखी घट पाहायला मिळाली. बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मुंबईत 167 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 286 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर एकाही रुग्णांचा मृत्यू झाला नाही. शुक्रवारी आणि शनिवारी मुंबईत एका रुग्णाचा मृत्यूची नोंद होती. रविवारी कोरोनामुळे मुंबईत एकही मृत्यू नाही. दिलासादायक बाब म्हणजे, मुंबईतील कोरोना रुग्ण दुपटीचा दर तीन हजार दिवसांवर पोहचला आहे. तसंच रिकव्हरी रेट 98 टक्क्यांवर गेला आहे. मुंबईतील ओमायक्रॉन व्हेरियंटच्या लाटेच्या तुलनेत मुंबईतील कोरोना रुग्णसंख्यामध्ये घट झाल्याचे पाहायला मिळाली आहे. मुंबईतील कोरोना महामारीची तिसरी लाट ओसरली आहे. मुंबईतील कोरोनाची परिस्थिती दुसऱ्या लाटेनंतर ज्याप्रमाणे होती, तशी झाली आहे.
मुंबई महानगरपालिकेने (Mumbai BMC) दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मुंबईत 167 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 345 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दिलासादायक बाब म्हणजे रविवारी कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. तसंच कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी 3097 दिवसांवर आला आहे. मंगळवारी कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी 2407 इतका होता. त्यामुळे सातत्याने मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिसत आहे. रविवारी मुंबईतील 286 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे आर्थिक राजधानीतील एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 10,34,493 इतकी झाली आहे. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर 98 टक्के इतका झाला आहे. मुंबईतील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 1151 इतकी झाली आहे. याशिवाय मुंबईतील साप्ताहिक कोरोना रुग्णवाढीचा दर ही 0.02% टक्के इतका झाला आहे. आज नव्याने आढळलेल्या 169 रुग्णांपैकी 19 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पालिकेकडील 36 हजार 317 बेड्सपैकी केवळ 819 बेड वापरात आहेत.
महत्वाच्या बातम्या
- K Chandrasekhar Rao : तेलंगणा राज्याच्या निर्मितीत शरद पवार यांची मोठी भूमिका : के. चंद्रशेखर राव
- पंतप्रधान मोदींना सत्तेपासून दूर करु, आम्हाला मदत करणारे सरकार सत्तेत आणू : के. चंद्रशेखर राव
- Punjab Election: जोपर्यंत बाबा जिंकत नाहीत तोपर्यंत लग्न करणार नाही... नवज्योत सिंह सिद्धूच्या मुलीने घेतली शपथ
- Goa Election 2022 : आदित्य ठाकरे गोव्याच्या मैदानात, पहिल्याच सभेत नवी घोषणा, गोव्याची शान, धनुष्य बाण