Mumbai Coronavirus Cases : मुंबईतील कोरोना (Corona) रुग्णाची संख्या काहीशी स्थिरावताना दिसत आहे. मागील काही दिवसांत प्रचंड प्रमाणात सापडणारे रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी होत असल्याने प्रशासनासह नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे. मुंबईमध्ये शनिवारी 10,661 नवे कोरोना रुग्ण आढळल्याची माहिती बीएमसीने दिली आहे. 11 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 21,474 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 

धारावीत आज 40 नवे रुग्ण सापडले, दादरमध्ये 120 तर माहिममध्ये कोरोनाचे 126 नवे रुग्ण सापडले आहेत. या तीन विभागात आज एकूण 286 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत आज 10661 नव्या रुग्णांची भर पडली आहे.  दिलासादायक बाब म्हणजे आज 21474 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.  मुंबईतील एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 8,99,358 इतकी झाली आहे. तर रुग्ण बरे होण्याचा दर 91% इतका झाला आहे. मुंबईतील एकूण सक्रिय रुग्ण 73518 इतके झाले आहेत. तर मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर 43 दिवस झाला आहे.  

गेल्या काही दिवसांतील मुंबईतील रुग्णसंख्येची आकडेवारी -

तारीख मुंबईतील रुग्णसंख्या
24 डिसेंबर 683
25 डिसेंबर 757
26 डिसेंबर 922
27 डिसेंबर 809
28 डिसेंबर 1377
29 डिसेंबर 2510 
30 डिसेंबर 3671
1 जानेवारी 6347
2 जानेवारी 8063
3 जानेवारी 8082
4 जानेवारी 10860
5 जानेवारी 15166
6 जानेवारी 20181
7 जानेवारी 20971
8 जानेवारी 20,318
9 जानेवारी 19474
10 जानेवारी 13,648
11 जानेवारी 11,647
12 जानेवारी 16,420
13 जानेवारी 13, 702
14 जानेवारी 11, 317
15 जानेवारी 10,661

महत्त्वाच्या बातम्या : 

मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live