Maharashtra Corona Update : राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू शकतात याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) सूचक इशारा दिला आहे.  महाराष्ट्रात जर ऑक्सीजन बेडची मागणी वाढत गेली आणि ऑक्सिजनची मागणी सातशे मेट्रिक टनपर्यंत गेली तर मुख्यमंत्री राज्यातील निर्बंधांबाबत कठोर निर्णय घेतील, असं अजित पवार यांनी पुण्यात बोलताना म्हटलं आहे. 


गेल्या काही दिवसांपासून राज्यातील रुग्णसंख्येमध्ये मोठी वाढ


गेल्या काही दिवसांपासून राज्यातील रुग्णसंख्येमध्ये मोठी वाढ होत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 43, 211 नव्या रुग्णांची भर झाली असून 19 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 33, 356 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात अधिक रुग्णांची भर पडल्याचं दिसून येतंय. त्यामुळे राज्याच्या चिंतेत भर पडली आहे. राज्यात काल 238 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे.  आतापर्यंत 1605 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात  झाली आहे. त्यापैकी 859 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. 


आसाममधील मुलांना परत आणण्याची जबाबदारी असिम गुप्तांवर- अजित पवार 


अजित पवार म्हणाले की, आसाममधील मुलांना परत आणण्याची जबाबदारी असिम गुप्तांवर सोपविण्यात आलीय. मुंबै बँक निवडणुकीवर बोलताना ते म्हणाले की, त्यांनी यावेळी म्हटलं की, मुंबै बँकेसाठी शिवसेनेचा उपाध्यक्ष का निवडून आला नाही याबाबत मी माहिती घेईन.


त्यांच्या मोबाईल नंबरनं फोन केल्याच्या प्रकरणावर बोलताना अजित पवार पवार यावेळी म्हणाले की, माझ्या नावाने ज्या बांधकाम व्यावसायिकाला फोन करण्यात आला ते अतुल गोयल मला ओळखतात.  त्यांना ठावूक आहे की माझा फोन गेला की पलीकडच्या व्यक्तीला प्रायव्हेट नंबर आल्याचे दिसते.  त्यामुळे त्यांनी मला फोन केला.  मी वळसे पाटील यांना सांगितले आणि सायबर पोलिसांना याची माहिती देण्याचे ठरले. आरोपींना अटक करण्यात आलीय आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असं अजित पवार म्हणाले.


पवार यावेळी म्हणाले की,  पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष ठरवण्यासाठी आम्ही बैठक झाली. सगळ्यांची मते जाणून घेतली. आता मी,  वळसे पाटील आणि दत्तात्रय भरणे आम्ही एकत्रित निर्णय घेऊ, असं ते म्हणाले. 



इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha