मुंबई : आज नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुप्पट झाली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 83 टक्क्यांवर आला आहे. राज्यात आज एका दिवसात नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुप्पट नोंदविली आहे. 26 हजार 440 रुग्ण बरे होऊन घरी गेले तर 11 हजार 416 नवीन रुग्णांचे निदान झाले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 82.76 टक्के एवढे झाले आहे. राज्यातील उपचाराखाली असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस कमी होत आहे.


राज्यातील अॅक्टिव्ह रुग्ण म्हणजेच उपचार घेत असलेल्या रुग्णांचा आकडा आज 2 लाख 21 हजार 156 इतका खाली आला आहे. राज्यातील कोरोना मृत्यूंचा आकडा वाढतच चालला आहे. आज 308 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.64 टक्के एवढा आहे. राज्यात 26 हजार 440 इतके रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 12 लाख 55 हजार 779 कोरोना बाधित रुग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 82.76 टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज 11 हजार 416 नवीन रुग्णांचे निदान झाले. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 75 लाख 69 हजार 447 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 15 लाख 17 हजार 434 नमुने कोरोनासाठी पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 22 लाख 68 हजार 57 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर 24 हजार 994 व्यक्ती संस्थात्मक मध्ये आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री यांनी दिली.


कोरोनाने घेतला आयएएस अधिकाऱ्याचा बळी, परभणीच्या सुधाकार शिंदे यांचे निधन


राज्यात आज नोंद झालेल्या 308 मृत्यूंपैकी 168 मृत्यू हे मागील 48 तासांतील आहेत तर 60 मृत्यू मागील आठवड्यातील आहेत व उर्वरित 80 मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत, असे नमूद करण्यात आले आहे. गेल्या 24 तासांत सर्वाधिक 48 मृत्यू पालिका हद्दीत झाले तर सातारा जिल्ह्यात 26, पुणे जिल्ह्यात 22 आणि सोलापूर जिल्ह्यातही 22 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.


नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होणार?


राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. अशातचं आता नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होणार असल्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. अनलॉक 5 अंतर्गत राज्यातील सुमारे चार लाख रेस्टॉरंट, हॉटेल आणि बार पुन्हा सुरु झाले आहेत. त्यामुळे नोव्हेंबर अखेरपर्यंत राज्यातील शाळा, महाविद्यालय, धार्मिक स्थळे आणि व्यायाम शाळा उघडण्यास परवागनी देण्यात येणार असल्याचे टोपे म्हणाले.


UNLOCK | नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होणार?, आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे संकेत