एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
हाजी अली दर्गा महिला प्रवेशाबाबत आज हायकोर्टात फैसला
मुंबई: हाजी अली दर्ग्यात महिलांच्या प्रवेशाबाबत आज हायकोर्टात फैसला होणार आहे. हाजी दर्ग्यातल्या मजारजवळ महिलांना प्रवेशास बंदी आहे. पुरुषांप्रमाणं महिलांनाही दर्ग्यात प्रवेश मिळावा यासाठी, डॉ. नुरजा नियाज आणि इतर संघटनांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे.
याआधी शनी चौथऱ्यावर महिलांना प्रवेश नाकारता येणार नाही, असा निकाल हायकोर्टानं दिला आहे. त्यामुळं आता हाजीअली संदर्भातही असाच निर्णय देऊन महिलांनाही प्रवेश मिळणार का? याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.
दरम्यान, भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी काही दिवसांपूर्वीच पोलीस बंदोबस्तात हाजी अली दर्ग्यात जाऊन दर्शन घेतलं होतं. जिथपर्यंत महिलांना प्रवेश आहे तिथपर्यंतच तृप्ती देसाईंना प्रवेश देण्यात आला होता. त्यामुळे मजारपर्यंत महिलांना प्रवेश दिला जावा यासाठी आपला लढा सुरू राहणार असल्याचंही तृप्ती देसाई यांनी म्हटलं होतं.
हाजी अली दर्ग्यात सध्या महिलांना विशिष्ट मर्यादेपर्यंतच प्रवेशाची परवानगी आहे. मजार-ए-शरीफमध्ये महिलांना प्रवेश करण्यास मनाई आहे. मात्र, पुरूषांच्या बरोबरीने महिलांनाही त्याठिकाणी प्रवेश द्यावा, अशी मागणी केली जात आहे. त्याच प्रकरणावर हायकोर्ट आपला निकाल सुनावणार आहे.
संबंधित बातम्या:
तृप्ती देसाई हाजी अली दर्ग्यात दाखल, मात्र मजार प्रवेश नाही
तृप्ती देसाई दर्ग्यात आल्यास चपलाचा प्रसाद देऊ : हाजी अराफात
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
व्यापार-उद्योग
Advertisement