एक्स्प्लोर

नशेसाठी आणलेले टेम्पोभरुन कफ सीरप जप्त, तीस लाखांचा साठा हस्तगत

याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली असून हे सर्व कपड्यात लपवून कफ सिरपच्या बाटल्यांची तस्करी करत असल्याचे कारवाईतून उघड झाले आहे.

मुंबई : मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने नशेसाठी आणलेला कफ सीरपचा तीस लाखांचा साठा हस्तगत केला आहे. मरिन लाईन्स येथील बडा कब्रस्थान या ठिकाणी पोलिसांनी कफ सिरपच्या बाटल्या भरलेला टेम्पो ताब्यात घेतला. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली असून हे सर्व कपड्यात लपवून कफ सिरपच्या बाटल्यांची तस्करी करत असल्याचे कारवाईतून उघड झाले आहे. गुजरातहून मोठ्या प्रमाणावर 'कोडेन फॉस्फेट' या सीरपचा साठा मुंबईत येणार असून तो नशेसाठी वितरित केला जाणार असल्याची अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी त्यांच्या मागावर होते. एक टेम्पो भरून कफ सीरपच्या बाटल्या मुंबईत आणण्यात येताच पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वांद्रे युनिटने मरिन लाईन्स येथील बडा कब्रस्थान येथून एक टेम्पो ताब्यात घेतला. या प्रकरणी वीरेंद्र सिंग, यशपाल गोपाल सिंग, सर्वर मोहम्मद शेख, अझहर जमाल सय्यद या चौघांना अटक करण्यात आली. यापैकी दोघे हा टेम्पो गुजरातहून घेऊन आले होते तर अन्य दोघे या कफ सिरपची नशेसाठी खरेदी करण्यासाठी आले होते. टेम्पो तसेच टेम्पोमध्ये लपवण्यात आलेल्या 5760 कफ सिरपच्या बाटल्यांचा साठा पोलिसांनी जप्त केला. मरिन लाईन्स बडा कब्रस्थान येथून वानखेडे स्टेडियम काही मिनिटांच्या अंतरावर आहे. इतकी मोठी कारवाई करण्यात आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. या ठिकाणी या सीरपची डील केल्यास कोणाला संशय येणार नाही, या उद्देशाने या जागेची निवड करण्यात आली असावी, असं शिवदीप लांडे यांनी सांगितलं. अटक केलेल्या आरोपींना 8 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

भिवंडी इमारत दुर्घटना प्रकरण! बिल्डिंग मालकासह कंत्राटदारावर गुन्हा दाखल, 10 जणांच्या मृत्यूनंतर कारवाई
भिवंडी इमारत दुर्घटना प्रकरण! बिल्डिंग मालकासह कंत्राटदारावर गुन्हा दाखल, 10 जणांच्या मृत्यूनंतर कारवाई
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
Mumbai High Court FDA: 'यापेक्षा चपलांचा स्टँड स्वच्छ असतो'; मंत्रालयाच्या कँटीनमधील फोटो पाहताच उच्च न्यायालयाने एफडीएला खडसावले, कोर्टात नेमकं काय घडलं?
'यापेक्षा चपलांचा स्टँड स्वच्छ असतो'; मंत्रालयाच्या कँटीनमधील फोटो पाहताच उच्च न्यायालयाने एफडीएला खडसावले, कोर्टात नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget