ठाणे : ठाणेकरांसाठी एक आनंदाची बातमी. ठाणे शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 89 टक्यांवर आले असून ठाणे शहर हे राज्यात रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात पहिल्या क्रमांकावर आले आहे. तर देशात ठाणे शहर हे दुसऱ्या क्रमांकावर आले आहे. महाराष्ट्राचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 71 टक्के आहे. सध्याच्या घडीला ठाण्यात 21139 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्यांची संख्या ही 1940 एवढी आहे. इतकेच नव्हे तर रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाणही 102 दिवसांवर आले आहे. त्यामुळे ठाण्यातील कोडची परिस्थिती सध्या सुधारते आहे असेच म्हणावे लागेल.


ठाणे शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. मार्च महिन्यापासूनच कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतांना दिसत होती. त्यानंतर मे, जूनमध्येही कोरोना बाधित रुग्णांची संख्या दुपटीने वाढली होती. त्यानंतर टप्याटप्याने ऑनलॉक जाहीर झाला होता. परंतु ठाणे महापालिकेच्या माध्यमातून या कालावधीतही दोन वेळा लॉकडाऊन जाहीर केला होता. त्यावेळेस पालिका प्रशासनावर आणि सत्ताधाऱ्यांवर विरोधकांनी टीका केली होती पण आताच्या घडीला कोरोनाचे प्रमाण काहीसे कमी झाले आहे.


पाहा व्हिडीओ : ठाण्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेची आयुक्तांकडून पाहणी



धारावीत जो पॅटर्न वापरून कोविड 19 चे रुग्ण कमी केले गेले तोच पॅटर्न ठाण्यात वापरण्यात आला. प्रत्येक रुग्णाचे जिओ टॅगिंग केले गेले. त्याच्या संपर्कात असलेल्या 43 व्यक्तींना विलगीकरण कक्षात पाठवण्यात आले. असे करून आज सर्व प्रभाग समितीत रुग्ण कमी झाले आहेत. आतापर्यसंत ठाण्यात 23001 रुग्ण आढळून आले. त्यापैकी 21139 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यावरून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 89% इतके जास्त असल्याचे दिसून येत आहे. त्याच प्रमाणे शहरातील मृत्यू दर देखील कमी होऊन तो 3.2 टक्के वर आलाय. आणि रुग्ण दुप्पटीचा कालावधी 102 दिवसांवर पोचलाय. ठाण्यात आजपर्यंत 17 लाख पेक्षा जास्त लोकांचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. त्यासाठी प्रत्येक प्रभागात टिम्स कार्यरत आहेत. आजपर्यंत 1 लाख 38 हजार 467 लोकांच्या अँटी जेन आणि आर टी पीसीआर टेस्ट करण्यात आलेल्या आहेत, असे पालिका आयुक्त डॉ विपीन शर्मा यांनी सांगितले.


वेगवेगळ्या शहरातील रुग्ण बरे होण्याची टक्केवारी :




  • ठाणे - 89 टक्के

  • नवीमुंबई - 82 टक्के

  • कल्याण - डोंबिवली - 85 टक्के

  • पुणे महापालिका - 78 टक्के

  • मुंबई - 81 टक्के


महत्त्वाच्या बातम्या : 

गुड न्यूज! ठाणे शहरात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 89 टक्क्यांवर

कोरोना काळात कॉण्टॅक्ट ट्रेसिंग वाढवलं पाहिजे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या सूचना