मुंबई : राज्यात सुरू असलेल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून कोरोना रुग्णांना मोफत उपचार मिळतील यासाठी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तालुकास्तरावर रुग्णवाहिका उपलब्ध राहतील याकडे जिल्हाधिकऱ्यांनी लक्ष घालावे. लवकर निदानासाठी काही जिल्ह्यांमध्ये कॉण्टॅक्ट ट्रेसिंग वाढवण्याची गरज असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. चाचण्यांची क्षमता पुरेशी असून त्याचा पूर्णपणे वापर करण्याचे आवाहन आरोग्मंत्र्यांनी केले.


कोरोना काळात ट्रेसिंग वाढवलं पाहिजे अशा सूचना काही जिल्ह्यांना देण्यात आल्या आहेत. एक कोरोन बाधित रुग्ण संबंधित कमीत कमी 15 लोकांचे ट्रेसिंग केले पाहिजे, या राज्य सरकारच्या सूचना आहेत. मात्र खालील जिल्ह्यात कमी ट्रेसिंग होत आहे.


कॉण्टॅक्ट ट्रेसिंग कमी असलेले जिल्हे


परभणी- 8
नंदुरबार - 9.2
कोल्हापूर- 9.5
सातारा- 11.8
सोलापूर- 12.9
अहमदनगर- 13.9


या जिल्ह्यात ट्रेसिंग वाढवावी या सूचना आज देण्यात आल्या. टेलीआयसीयू सुविधा राज्यात सुरू झाली असून भिवंडीमध्ये त्याच्या वापराने फायदा होत असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. जेथे विशेषज्ञ उपलब्ध नाही तेथे ही सुविधा फायदेशीर ठरत असल्याचे सांगतानाच सध्या सीएसआरच्या माध्यमातून ही योजना सुरू असून राज्यात तिचा विस्तार करण्याची आवश्यकता असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.


राज्यात मृत्यूदर जास्त असलेले जिल्हे

मुंबई - 5.54 टक्के
नंदुरबार - 4.48 टक्के
सोलापुर - 4.35 टक्के
अकोला - 4.24 टक्के
लातूर - 3.83 टक्के
जळगाव - 3.78 टक्के
रत्नागिरी- 3.69 टक्के
राज्याच्या मृत्यूदर- 3.35 टक्के

How to use mask? तुम्ही मास्क योग्य पद्धतीने वापरताय? मास्कचा वापर योग्यरित्या कसा करावा?