ठाणे : ठाणे शहरातील कोरोनाची रुग्ण संख्या हळूहळू आटोक्यात येत असल्याचे चित्र आहे. मंगळवारी 144 नवे रुग्ण सापडले असून 7 जणांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसातील हा सर्वात कमी नवीन रुग्णांचा आकडा म्हणावा लागेल. आज 85 रुग्ण बरे होऊन घरी परतले, तर मृतकांचा आतापर्यंतचा एकूण आकडा 758 वर गेला आहे. ठाणे शहरातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता तब्बल 89 टक्क्यांवर पोहोचले आहे.


ठाणे महापालिकेच्या 9 प्रभाग समितीत मंगळवारी आढळलेल्या रुग्णात माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीत 29 नवे रुग्ण सापडले. याठिकाणी सोमवारी रुग्ण संख्या 35 होती. वर्तकनगर प्रभाग समितीत मंगळवारी 8 नवे रुग्ण आढळले. तर सोमवारी आढळलेल्या रुग्णांची संख्या 22 एवढी होती. लोकमान्य-सावरकरनगर प्रभाग समितीत मंगळवारी 7 नवे रुग्ण सापडले तर सोमवारी रुग्णांची संख्या 13 एवढी होती.


नौपाडा-कोपरी प्रभाग समितीत मंगळवारी नव्या रुग्णांची संख्या 21 होती. तर सोमवारी मात्र रुग्णांची संख्या 33 एवढी होती. उथळसर प्रभाग समितीत मंगळवारी 20 नव्या रुग्ण सापडले तर सोमवारी मात्र रुग्णांची संख्या 23 एवढी होती. वागळे प्रभाग समितीत 7 नव्या रुग्णांचा भरणा झाला होता तर सोमवारी मात्र 12 रुग्ण आढळले होते. कळवा प्रभाग समितीत मंगळवारी नवे 37 रुग्ण आढळले तर रुग्णांचा आकडा सोमवारी 35 एवढा होता. मुंब्रा प्रभाग समितीत मंगळवारी 5 नव्या रुग्णांचा भरणा झाला तर सोमवारी याच प्रभाग समितीत रुग्ण संख्या 8 इतकी होती. दिवा प्रभाग समितीत मंगळवारी 10 नवे रुग्ण आढळले तर सोमवारी रुग्णांची संख्या 10 इतकी होती.


मंगळवारी 9 प्रभाग समितीत उपचार घेऊन बरे झालेल्या आणि घरी गेलेल्या रुग्णांची संख्या 85 एवढी होती. तर आतापर्यंत उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही 20 हजार 989 एवढी आहे. तसेच आज उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 1885 एवढी आहे. आतापर्यंत शहरात 1 लाख 35 हजार 57 रुग्णांची चाचणी करण्यात आलेली आहे. अँटीजन आणि आरटीपीसीआर अशा दोन्ही पद्धतीने चाचण्या सध्या ठाणे महापालिकेच्या हेल्थ क्लिनिकमध्ये सुरू आहेत.


Dharavi pattern in Philippines | मुंबईतला धारावी पॅटर्न आता फिलिपिन्स सरकार राबवणार, धारावी पॅटर्नचा जगभरात डंका!