एक्स्प्लोर

Coronaupdate | राज्यात कोरोनाचा सातवा बळी, मुंबईत 40 वर्षीय महिलेचा मृत्यू

कोरोना व्हायरसने मुंबईत आणखी एक बळी घेतला आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 193 वर पोहोचली आहे

मुंबई : राज्यात कोरोनाने सातवा बळी घेतला आहे. एका 40 वर्षीय महिलेचा मुंबईत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. काल शनिवारी या माहिलेला छातीत दुखू लागलं म्हणून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. आज सकाळी तिचा मृत्यू झाला आहे. या महिलेची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह असल्याचे रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले आहे. मुंबईत आतापर्यंत कोरोनानं 5 बळी घेतले आहेत. तर मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरातून मुंबईत उपचारासाठी आलेल्यांपैकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागानं यासंदर्भातील माहिती देताना म्हटलं आहे की, सदर महिलेला कोरोनासदृश्य लक्षण आढळून आल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर कोरोना तपासणीत महिलेला संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं. दरम्यान, आज उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. दरम्यान, राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 193 वर पोहोचली आहे. आज पुण्यात 5, मुंबई 4, जळगाव, सांगली,नागपुरात प्रत्येकी 1 नवा रुग्ण सापडला आहे. Coronaupdate | राज्यात कोरोनाचा सातवा बळी, मुंबईत 40 वर्षीय महिलेचा मृत्यू अमेरिकेमध्ये चीनपेक्षा जास्त संसर्ग अमेरिकेमध्ये कोरोना व्हायरसमुळे 1 लाख 23 हजार 750 बाधित आहेत. ज्यापैकी 2227 लोकांता मृत्यू झाला आहे. चीनमध्ये निर्माण झालेल्या या व्हायरसने आतापर्यंत 3300 लोकांचा बळी घेतला आहे. तर 81439 लोकांना संसर्ग झाला आहे. दरम्यान, चीनमध्ये आता नव्या रूग्णांची संख्या घटली असून 40 ते 50 रूग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. इटलीमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या दहा हजारांवर इटलीमध्ये कोरोना व्हायरसने हैदोस घातला आहे. कारण शनिवारी 889 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मृतांचा आकडा दहा हजार पार पोहोचला आहे. कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या इटलीमध्ये सर्वाधिक आहे. देशामध्ये या घातक आजारामुळे एकूण 10023 लोकांचा मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये 92472 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. स्पेनमध्ये मागील 24 तासांमध्ये 832 लोकांचा मृत्यू स्पेनमध्ये कोरोना व्हायरसमुळे मागील 24 तासांत 832 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर संसर्गामुळे मरणाऱ्यांची एकूण संख्या 5982 झाली आहे. स्पेनमध्ये दररोज आठ हजारांपेक्षा अधिक कोरोनाचे नवे रूग्ण आढळून येत आहेत. फ्रान्समध्ये 319 लोकांचा मृत्यू फ्रान्समध्ये शनिवारी कोरोना व्हायरसमुळे 319 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर देशात महामारीमुळे मृत्यू झालेल्यांचा आकजा 2314 वर पोहोचला आहे. फ्रान्समध्ये आतापर्यंत कोरोनाचा 37575 लोकांना संसर्ग झाला आहे. 17620 लोक हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. पाहा व्हिडीओ : मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड 19, मदत पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचं आवाहन इराणमध्ये संसर्ग झालेल्यांचा आकडा 35408 वर इराणमध्ये कोरोना व्हायरसमुळे कोरोना बाधितांचा आकडा झपाट्याने वाढत असून आतापर्यंत 35408 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर तुर्कीमध्ये शुक्रवारपर्यंत 2517 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर पाकिस्तानमध्ये 1400 पेक्षा अधिक नवीन प्रकरणं समोर आली आहेत. पाकिस्तानमध्येही कोरोनाने हैदोस घातला आहे. येथे 12000 अधिक कोरोना संशयित आहेत. तर 1400 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. पंजाब प्रांतात 490, सिंध येथे 457, खैबर पख्तूनख्वामध्ये 180, तर बलूचिस्तान येथे 133, गिलगित-बाल्टीस्तान 107, इस्लामाबाद 39 आणि पाकव्याप्त काश्मिरमध्ये 2 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत 11 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत 1000 लोकांचा मृत्यू ब्रिटनमध्ये मागील 24 तासांमध्ये कोरोना व्हायरसमुळे 260 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर देशात कोरोनामुळे जीव गमावलेल्यांची संख्या 1000 वर पोहोचला आहे. तर कोरोना बाधितांचा आकडा वाढला असून 17089 वर पोहोचला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुनावणी
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
CM Devendra Fadnavis Maharashtra Government: मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Embed widget