नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं वाढत असताना दिल्लीतल्या निजामुद्दीनमध्ये झालेल्या 'मर्कज' कार्यक्रमातून अनेकांना संसर्ग झाल्याची घटना समोर आली आहे. अनेक माध्यमांनी या घटनेचे सत्य समोर आणलं. त्यावरुन आता टिव्ही अँकर्स आणि पत्रकरांना धमक्या येत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून काही समाजकंटक अँकर्स आणि पत्रकारांचे नाव घेत त्यांना धमकावत आहेत. याची दखल आता न्यूज ब्रॉडकॉस्टर्स एसोसिएशन म्हणजे NBA ने घेतली आहे. एनबीएने याविरोधात पोलीस आणि प्रशासनाकडे धमकी देणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.
कोरोना विरोधातल्या या लढाईत माध्यमांनी जनजागृती करण्याचे काम केल्याचंही एनबीएने सांगितले. अशातच मर्कज कार्यक्रमातून अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचे सत्य माध्यमांनी सांगितले. काही समाजकंटकांनी बातम्या देणारे टिव्ही चॅनेल्सचे अँकर्स आणि पत्रकरांना व्हॉट्सअप, टिकटॉक आणि ट्विटर सारख्या सोशल मीडिया माध्यमातून टारगेट केल जात असल्याचं एनबीएने सांगितले आहे. सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतून धार्मिक प्रचारक काही न्यूज अँकर्सचे नाव घेऊन त्यांच्यावर हल्ला करण्याची धमकी देताना दिसत आहे. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या अशा समाटकंटकांवर कारवाई करण्याची मागणी एनबीएने केली आहे.
Coronavirus | कोरोना व्हायरस संदर्भात फेक न्यूजची सुप्रीम कोर्टाकडून दखल; NBA ला आदेश
संकटकाळात माध्यमांकडून योग्य काम
लॉकडाऊनच्या परिस्थितीत इलेक्ट्रॉनिक मीडिया खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे. निष्पक्ष पत्रकारिता करत लोकांपर्यंत सत्या पोहचवत असल्याचे एनबीएने म्हटले आहे. सोबतचं कोरोना व्हायरस विषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती माध्यमं करत असल्याचंही एनबीएने म्हटलं आहे. अशात धार्मिक कट्टपंथीयांकडून पत्रकारांना मिळणाऱ्या घटनेवर एनबीएने टीका केली आहे. अशा प्रकारची कृत्य हे संविधानाने दिलेल्या अधिकाराच्या विरोधात असल्याचंही एनबीएने म्हटलं आहे.
तबलिगी जमातच्या लोकांनी माफी मागावी; काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांची मागणी
मर्कज म्हणजे काय?
दिल्लीतील निजामुद्दीन इथे जे मर्कज (उर्दू शब्द) आहे, त्याला तब्लिग जमातचे संस्थान असं म्हणतात. प्रत्येक शहरात तब्लिग जमातच्या मशिदी असतात. त्या मशिदींपैकी एक मुख्य मशीद ही मर्कज असते अर्थात त्याला संस्थान म्हणतात. (उदा. पिंपरी चिंचवड शहरात एकूण 80 तब्लिक जमातीच्या मशिदी आहेत, त्यांची एका मुख्य मशिदीमध्ये सर्वांना माहिती जमा करावी लागते. कोण-कुठे-कधी आणि किती दिवस बाहेरच्या शहरात-राज्यात जमातसाठी जातात) देशातील या सर्व मरकजची शिखर संस्था ही दिल्लीतील निजामुद्दीन येथे आहे. इथे परदेशात जमातला गेलेल्या आणि तिथून परतलेल्या प्रत्येक मुस्लीम तब्लिगी बांधवांना माहिती द्यावी लागते. परदेशातून निजामुद्दीन मरकजमध्ये रिपोर्ट केल्यानंतर तिथून प्रत्येकाला विविध राज्यातील शहरात प्रबोधनासाठी पाठवले जाते. पण कोरोनामुळे प्रत्येकाला आपापल्या गावी पाठवण्यात आलं. मरकजमध्ये देशव्यापी कॉन्फरन्सही होत असतात. (जमातीला जाण्याचा कार्यकाळ हा 3 दिवस ते 4 महिन्याइतका असतो, या जमातीमध्ये प्रबोधन केले जाते)
Corona Positive Patient | लातूरमधील आंध्र प्रदेशच्या 8 नागरिकांना कोरोना, सर्वांचा मरकज प्रकरणाची संबंध