मुंबई : मुंबईत सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळलेले मुंबईतील विभाग मुंबईचे हॉटस्पॉट म्हणून ओळखले जात आहेत. जी दक्षिण आणि ई हे वॉर्ड अतिगंभीर प्रकारात मोडतात. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मातोश्री हे निवासस्थान गंभीर स्थिती असलेल्या विभागांमध्ये मोडत आहे.


तसेच मुख्ययमंत्र्यांच्या वर्षा हे सरकारी निवासस्थानही गंभीर स्थिती असलेल्या डी वॉर्डमध्ये जी दक्षिण आणि ई हे वॉर्ड अतिगंभीर स्वरुपाचे हॉटस्पॉट आहेत. या दोन्ही प्रशासकीय विभागात 40 पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. जी दक्षिणमध्ये मुंबईतील सर्वाधिक म्हणजे 68, तर ई वॉर्डमध्ये 44 कोरोनाग्रस्त सापडले आहेत. 5 एप्रिलपर्यंत सापडलेल्या रुग्णांच्या आकड्यावरुन हे हॉटस्पॉट ठरवण्यात आले आहेत.


ई वॉर्डमध्ये भायखळा, रे रोड, सुखलाजी स्ट्रीट, वाडीबंदर या भागांचा समावेश होतो. काल रुग्णांची वाढ झाल्यामुळे हा भाग पाचव्या क्रमांकावरुन दुसऱ्या क्रमांकावर गेला. के पूर्व आणि वांद्रे-कलानगर असलेला एच पूर्व या विभागांमध्ये फक्त एका रुग्णाचा फरक आहे. एखादा रुग्ण वाढला, तर कलानगर असलेला विभाग टॉप- 5 मध्ये जाईल. या विभागामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मातोश्री हे खाजगी निवासस्थान येते.


मुंबईतील टॉप- 8 कोरोना हॉटस्पॉट


जी दक्षिण- 68 रुग्ण


परळ एसटी डेपो, वरळी गाव, वरळी डेअरी परिसर, वरळी बीडीडी चाळ, गांधी नगर, महालक्ष्मी रेसकोर्स, नेहरु तारांगण, शांती नगर


ई वॉर्ड - 44 रुग्ण


जीजामाता उद्यान, माझगांव, कस्तुरबा हॉस्पिटल, नायर हॉस्पिटल, जे.जे हॉस्पिटल


के वेस्ट- के पश्चिम - 37 रुग्ण


ओशिवरा, वर्सोवा, अंबोली हिल, सात बंगला, मनिष नगर -भवन्स कॉलेज, विले पार्ले- मीठीबाई कॉलेज परिसर, गिल्बर्ट हिल


डी - 3४ रुग्ण


बेलासिस चाळ, वेलिंग्टन स्पोर्ट क्लब, प्रियदर्शीनी पार्क, कमला नेहरु पार्क, ऑपेरा हाऊस, खेतेवाडी

के इस्ट- के पूर्व - 26 रुग्ण


जोगेश्वरी, गुंदवली, वेरावली, विजय नगर, सहार एअरपोर्ट, सहार व्हिलेज, चकाला, विले पार्ले टेलिफोन एक्सचेंज


एच इस्ट


वांद्रे पूर्व, टिचर्स कॉलनी, गव्हर्नमेंट कॉलनी, भारत नगर, खेरवाडी, वांद्रे टर्मिनस, धारावी कॉलनी, सांताक्रुझ, युनिव्हर्सिटी कँपस


पी नॉर्थ - 24 रुग्ण


पुष्पा पार्क, तानाजी नगर, लिबर्टी गार्डन, दिंडोशी, पिंपरी पाडा, मालाड ईस्टचा काही भाग


एम वेस्ट - 21 रुग्ण


टिळक नगर, छेडा नगर, माहुल व्हिलेज परिसर


संबंधित बातम्या