एक्स्प्लोर

Coronavirus | मनसे अध्यक्ष राज ठाकरे विनामास्क मंत्रालयात!

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. यावेळी सर्व नेत्यांनी मास्क घातलेला असताना राज ठाकरे मात्र मास्क न घालताच मंत्रालयात पोहोचले. मास्क न घालण्यासंदर्भात राज ठाकरे यांची प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.

मुंबई : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक होणार आहे. या बैठकीसाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शेकाप नेते जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात मंत्रालयात दाखल झाले. परंतु यावेळी सर्व नेत्यांनी मास्क घातलेला असताना राज ठाकरे मात्र मास्क न घालताच मंत्रालयात पोहोचले. सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणं बंधनकारक असताना राज ठाकरे यांनी मात्र मास्कशिवाय मंत्रालयात आल्याने चर्चा रंगली आहे.

दरम्यान मास्क न घालण्यासंदर्भात राज ठाकरे यांची प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.

Coronavirus | मनसे अध्यक्ष राज ठाकरे विनामास्क मंत्रालयात!

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने काही नियम आणि अटी घालून दिल्या आहेत. त्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणं अनिवार्य आहे. मंत्रालयात आलेल्या बहुतांश नेत्यांनी मास्क वापरलेलं होतं. जेव्हा  एखादा नेता सरकारने सांगितलेले नियम पाळावे असं सांगत असतो, त्यावेळी त्याने स्वत: देखील त्याचं पालन करणं गरजेचं असतं. परंतु राज ठाकरे यांनीच मास्क न वापरल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. याचवेळी राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे मात्र मास्कमध्ये दिसले.

कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणं बंधनकारक आहे. तसंच सार्वजनिक मास्क न वापरल्यास एक हजार रुपयांच्या दंडाची तरतूद आहे. पण राज ठाकरे मास्क न लावताच मंत्रालयात आल्याने, कोरोना व्हायरससारख्या साथीमध्ये नियम आणि अटी सामान्यांसाठी आणि व्हीआयपींसाठी वेगळ्या आहेत का असाही प्रश्न आता विचारला जात आहे.

बैठकीला कोणाची हजेरी? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीला सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक मंत्री अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित आहेत. तर विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर,मनसे अध्यक्ष राज ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, रासपचे नेते महादेव जानकर, शेकापचे नेते जयंत पाटील, एमआयएमचे नेते इम्तियाज जलील, जोगेंद्र कवाडे, विनय कोरे, अशोक ढवळे, कपिल पाटील, राजेंद्र गवई इत्यादी नेते उपस्थित आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain Update: मुंबईसह 'या' चार जिल्ह्यांमध्ये पुढील 3 तास महत्त्वाचे, हवामान विभागाकडून'रेड अलर्ट' जारी
मुंबईसह 'या' चार जिल्ह्यांमध्ये पुढील 3 तास महत्त्वाचे, हवामान विभागाकडून'रेड अलर्ट' जारी
Maharashtra Breaking LIVE: हिंगोलीला पुन्हा भूकंपाचा सौम्य धक्का; 3.6 रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद
Maharashtra Breaking LIVE: हिंगोलीला पुन्हा भूकंपाचा सौम्य धक्का; 3.6 रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद
Mumbai Rains Latest Upates: पावसामुळे लोकल वाहतुकही खोळंबली, दक्षिण मुंबईवर काळ्या ढगांचे सावट, समुद्रात उंच लाटा; संपूर्ण परिसर धुक्याच्या चादरीत
पावसामुळे लोकल वाहतुकही खोळंबली, दक्षिण मुंबईवर काळ्या ढगांचे सावट, समुद्रात उंच लाटा; संपूर्ण परिसर धुक्याच्या चादरीत
Maharashtra Rain News Updates: पालघर, रायगडला रेड, मुंबई, ठाणे, वर्धा, नागपूरला ऑरेंज अलर्ट; राज्यभरात कोसळधारा, पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
पालघर, रायगडला रेड, मुंबई, ठाणे, वर्धा, नागपूरला ऑरेंज अलर्ट; राज्यभरात कोसळधारा, पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

व्हिडीओ

Gold-Silver Price Today : जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे नवे दर!
Zero Hour Full : खासदार, आमदारांच्या फुटीनंतर आता ठाकरेंनी आत्मचिंतन करायला हवं असं वाटतं का?
Uddhav Thackeray Special Report : ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार?
Raj Thackeray Special Report : फोडाफोडी, ऑपरेशनवर राज ठाकरेंची टीका, भाजपला इशारा
Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Rain News Updates: पालघर, रायगडला रेड, मुंबई, ठाणे, वर्धा, नागपूरला ऑरेंज अलर्ट; राज्यभरात कोसळधारा, पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
पालघर, रायगडला रेड, मुंबई, ठाणे, वर्धा, नागपूरला ऑरेंज अलर्ट; राज्यभरात कोसळधारा, पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
संतापजनक! चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू, पोटातील बाळही दगावले; नातेवाईकांचा रुग्णालयातच आक्रोश
संतापजनक! चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू, पोटातील बाळही दगावले; नातेवाईकांचा रुग्णालयातच आक्रोश
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
Rain Update: पुण्यातील बाजीराव रोडवर झाडपडी; मुंबईतही कारवर कोसळलं झाड, पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम
पुण्यातील बाजीराव रोडवर झाडपडी; मुंबईतही कारवर कोसळलं झाड, पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
Embed widget