मुंबई : राज्यात आज 1475 कोरोनाबाधित रुग्णांना यशस्वी उपचारांनंतर घरी सोडण्यात आलंय. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत राज्यभरात 35 हजार 156 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण बरे होण्याचा वेग राज्यात वाढताना दिसत आहे. आज कोरोनाचे नवीन 2436 नवे रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील कोरोना संक्रमितांचा आकडा 80 हजार 229 इतका झाला आहे. पैकी सध्या 42 हजार 215 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.



कोरोना चाचणीच्या आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 5 लाख 22 हजार 946 नमुन्यांपैकी 80 हजार 229 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. राज्यात 5 लाख 45 हजार 947 लोक होम क्वॉरंटाईन आहेत. तर संस्थात्मक क्वॉरंटाईन (Institutional Quarantine) सुविधांमध्ये 72 हजार 315 खाटा उपलब्ध असून सध्या 30 हजार 291 रुग्ण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये दाखल आहेत.


कोरोनाच्या प्रादुर्भावाने त्रस्त असलेल्या रुग्णांपैकी 139 कोरोनाबाधित रुग्णांच्या आज मृत्यू झालाय.


आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू




  • ठाणे जिल्हा - 93 (मुंबई 54, ठाणे 30, कल्याण डोंबिवली 7, वसई विरार 1, भिवंडी 1

  • नाशिक - 24 (नाशिक 2, जळगाव 14, मालेगाव 8)

  • पुणे - 16 (पुणे 14, सोलापूर 2)

  • कोल्हापूर - 5 (रत्नागिरी 5)

  • औरंगाबाद 1 (औरंगाबाद 1)


आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी 75 पुरुष तर 64 मिहला आहेत. आज नोंद झालेल्या 139 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 78 जण आहेत तर 53 जण हे वय वर्ष 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर आठजण 40 वर्षाखालील आहे. या 139 जणांपैकी 110 जणांमध्ये (79%) मधुमेह, उच्च रक्तदाब, ह्रदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड 19 मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 2849 झाली आहे. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी 27 मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत. तर उर्वरित मृत्यू 21 एप्रिल ते 2 जून या कालावधीतील आहेत.


राज्यातील 11 जिल्ह्यात अद्याप कोरोनासाठीच्या स्वॅब लॅब उपलब्ध नाही


महाराष्ट्रात मिशन बिगेन अगेन
देशभरात सर्वाधिक कोरोनाचा प्रभाव असलेलं राज्य हे महाराष्ट्र आहे, त्यामुळे राज्य सरकार राज्याला कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्नात आहे. केंद्र सरकारने अनलॉकची घोषणा करत हॉटेल आणि सलूनला परवानगी दिली असली तरी महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती पाहता मुख्यमंत्र्यांनी राज्यात केवळ नॉन कंटेनमेंट झोनमध्येच यासाठी परवानगी दिली आहे. महाराष्ट्रातही हळूहळू काही उद्योग अनलॉक होत आहेत. मात्र, नागरिक सोशल डिस्टन्सिंगचे पालन करतील ही अपेक्षा आहे. राज्यात मिशन बिगेन अगेन अंतर्गत सर्व गोष्टी पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहे.


Mission Began Again | मुंबईत गॅरेज सुरु करण्यास महापालिकेची परवानगी; कर्मचाऱ्यांना मास्क बंधनकारक