मुंबई : कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. अशातचं सर्वांचं मनोबल वाढवणारी एक सकारात्मक घटना शहरात घडली आहे. मुंबईच्या प्रिन्स अली खान रुग्णालयातून कोरोना बाधित 97 वर्षाच्या आमीना सुनेसरा यांना सात दिवसांच्या उपचारानंतर आज सुखरुप घरी सोडण्यात आले. वय जास्त असल्यामुळे आणि कमी ऐकू येत असल्याने उपचार करण्यास काही अडचणी आल्या पण आमीना यांच्या जिद्दीपुढे सर्व अडचणींनी लोटांगण घातले. आमीना यांच्या कुटुंबातील सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.


आमीना सुनेसरा या वय 97 वर्ष पण जिद्द अकल्पनिय आहेत. आठ दिवसांपूर्वी आमीन सुनेसरा यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. कोरोनाची लक्षण ही दिसत होती. त्यांना मुंबईच्या प्रिन्स अली खान रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि फक्त सात दिवसातच कोरोनावर मात करत आमीना सुखरुप घरी परतल्या.


आमीना सुरेसरा यांच्या कुटुंबात सात लोक आहेत. वय जास्त असल्यामुळे आमीना या घरीच असायच्या. घरातील सातही लोकांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. मात्र घरातील सदस्यांना कोणतीही लक्षणे होती. पण आमीना यांना कोरोनाची लक्षणे दिसत होती.


आमीना यांना ज्या वेळेस रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्या वेळेस त्यांची प्रकृती फार ठीक नव्हती. त्यात वय जास्त असल्यामुळे आमीना यांना खूप कमी ऐकू येतं. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यावर उपचार करणं डॉक्टरांसाठी थोड अवघड होतं. कारण कुटुंब पॉझिटिव्ह असल्यामुळे सर्वाना कॉरंन्टाईन करण्यात आलं होतं. तर मास्क आणि पीपीई किट आणि मास्क घातल्याशिवाय कोणी जवळ जाऊ शकत नाही. त्यामुळे सर्व गोष्टी इशाऱ्यातूनच समजण भाग होत जे डॉक्टरांसाठी अवघड होत.


प्रिन्स अली खान रुग्णालयांमध्ये कोरोनावर मात करुन घरी जाणाऱ्या आमीना या सर्वात वयोवृद्ध रुग्ण आहेत. हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यापासून ते कोरोनावर मात करून यशस्वीपणे घरी परतण्यापर्यंत आमीना यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होते. जेजणू काही सर्व ठीक आहे आणि आयुष्य सुंदर आहे हेच अधोरेखित करत होते. जिद्द असेल तर कोरोना सारख्या संकटावरही मात करू शकतो याच उत्तम उदाहरण म्हणजे आमीना सुनेसरा.


संबंधित बातम्या :