मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आहे. याचा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फटका बसत आहे. आधी दुष्काळ मग अवकाळी यातून कसाबसा वाचलेला शेतीमाल आता काढणीला आला आहे. मात्र, या कोरोनाच्या संकटामुळे हातातोंडाशी आलेला घास डोळ्यांसमोर मातीमोल होताना दिसत असल्याने शेतकरी हवालदील झाला हे. अनेक फळबागायत शेतकरी माल शेतातच फेकून देत आहे. तर, लाखमोलाचा फळे अक्षरशः जनावरांना टाकावी लागत आहे. बाजारपेठा सुरू असल्यातरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश भर सुरू असलेल्या लॉकडाऊनचा फटका जळगाव जिल्ह्यातील लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. शेकडो एकरवरील लिंबू विकला जात नसल्याने लाखो रुपयांचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. एकीकडे असे चित्र असताना याच वाया जाणाऱ्या लिबांचा वापर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करीत असल्याचं चित्र जळगाव जिल्हयात पाहायला मिळत आहे.


Lockdown | सांगलीतील मिरजेत लॉकडाऊनमध्येही सामूहिक नमाज पठण, 41 जण ताब्यात


लाखमोलाचा शेतीमाल शेतात पडून


कोरोनाच्या भीतीने मजूर कामावर येत नाहीत आणि आले तरी तोडलेला माल विकला जात नाही, अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. विक्रीअभावी माल झाडावरच पिकून खाली पडत असल्याने मोठे नुकसान शेतकऱ्यांना झेलावे लागत आहे. एकीकडे नुकसान होत असले तरी याच वाया जाणाऱ्या लिंबाच्या रसाचा उपयोग ग्रामीण भागात शेतकरी सॅनिटायझर म्हणून करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या भीतीने सॅनिटायझर तुटवडा भासत असल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची कोरोनाच्या विरोधातील ही शक्कल चांगलीच चर्चेचा विषय बनली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी 22 मार्चपासून लॉकडाऊन सुरू आहे. अशा परिस्थितीत भाव आणि बाजारपेठ उपलब्ध नसल्याने उभ्या पिकात जनावरं सोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलीय. परभणीतील उजळांबा येथील शेतकरी विलास साखरे यांनी मोठ्या मेहनतीने उन्हाळी टरबुज घेतले होते. मात्र दोन रुपये किलो भाव, त्यातल्या त्यात इतर भाजीपाला पीकही बाजारपेठ उपलब्ध नसल्याने शेतातचं पडून आहे. तर, टरबूज काढण्यासाठी परवडत नसल्याने त्यांनी चक्क त्यांची जनावरं या उभ्या पिकात सोडली आहेत. शिवाय मोठ्या मेहनतीने घेतलेला इतर भाजीपाला पीकही जागेवरच खराब होऊ द्यावा लागत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागतोय.


दिवे लावा, टाळ्या वाजवा हे सांगणं पंतप्रधानांचं काम आहे का? बाळासाहेब थोरातांचा संतप्त सवाल


कलिंगडाचे मोफट वाटप
कोरोनामुळे बाजारपेठ बंद असल्याने बेळगाव जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने चाळीस टन कलिंगडे मोफत वाटल्याची घटना घडली आहे. कोरोनाचा इफेक्ट आता शेतकऱ्यापर्यंत येऊन पोचलाय. कोरोनाच्या संकटामुळे ग्राहक नसल्याने कलिंगड लागवड केलेल्या शेतकऱ्याला दहा लाखाहून अधिकचा फटका बसला आहे. रायबाग तालुक्यातील खेमलापूर गावातील युवा शेतकऱ्याला दहा लाखाचे नुकसान सहन करावे लागले आहे. अडीच एकर जागेत सिद्धप्पा सनदी या तरुण शेतकऱ्याने कलिंगड लागवड केली होती. कलिंगड पीक हाताशी आले आणि तेव्हढ्यात कोरोनाचे संकट आले. कोरोनाच्या संकटामुळे फळांची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी पाठ फिरवली. त्यामुळे सिद्धप्पा सनदी या शेतकऱ्याने आपल्या आणि आजूबाजूच्या गावात चाळीस टन कलिंगडे मोफत वाटली. चाळीस टन कलिंगडे मोफत वाटुनही अजून तीस टन कलिंगडे शिल्लक राहिली आहेत. ही कलंगडी सिद्धपा फोडून टाकत आहे. नोकरी सोडून शेतीत वेगळे प्रयोग करून अर्थार्जन करण्याचे स्वप्न पाहिलेल्या सिद्धप्पा याला कोरोनामुळे चांगलाच शॉक बसला आहे.


Lockdown | पंतप्रधान मोदींना प्रत्येक गोष्टींचा इव्हेंट का करावा वाटतो : जितेंद्र आव्हाड