सध्या महिलेला आणि तिच्या बाळाला कस्तुरबा रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं असून त्यांना डिस्चार्ज देण्यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्याचप्रमाणे या महिलेच्या पतीला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे.
काय आहे प्रकरण?
चेंबूर येथील एका रुग्णालयात तीन दिवसाच्या बाळासह आईला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र, ही लागण कोणामुळे झाली हे स्पष्ट झालं नव्हतं. या रुग्णालयात एक व्यक्ती अॅडमिट होता. त्याला कोरोनाची लागण झाल्याचं समजल्यानंतर तिथून त्याला हलवण्यात आलं. मात्र, या रुग्णलयात निर्जंतुकीकरण न करताच इतर रुग्णांवर उपचार करण्यात आले.
दरम्यान, या रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याला देखील कोरोनाची लागण झाल्याचं समजलं. धक्कादायक बाब म्हणजे रुग्णालयातील कोरोनाचा रुग्ण असलेल्या विशेष वॉर्डमध्ये निर्जंतुकीकरण न करताच प्रसुती होणाऱ्या महिलेला ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर त्या महिलेला सिझेरियनद्वारे बाळ देखील झाले आणि त्या दरम्यानच त्या महिलेस बाळाला कोरोनाची लागण झाली.
रुग्णालयाच्या या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली. या रुग्णालयातून कोरोनाचा प्रसार झाल्याने तसंच कोरोनाच्या रुग्णाची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाला दिली नसल्याने ते सील करण्यात आलं आहे. सध्या या रुग्णालयाचे निर्जंतुकीकरण केले जात आहे. तसंच पुढील काही दिवस हे रुग्णालय बंदच राहणार आहे.
Corona Positive Baby | मुंबईत तीन दिवसांच्या बाळाला कोरोना व्हायरस, कोरोना रुग्णासोबत आई-बाळाला ठेवल्याचा आरोप