नवी मुंबई : आशियातील सर्वात मोठी एपीएमसी बाजारपेठ असलेल्या वाशीतील एपीएमसी मार्केटला सद्या कोरोनोची धास्ती लागली. एपीएमसीच्या पाचही मार्केटमध्ये रोज तब्बल 50 हजार लोकांची होणारी आवक जावक 50 टक्क्यांनी कमी करण्यासाठी व्यापारी प्रयत्न करत आहेत. यासाठी होलसेल व्यापाऱ्यांनी ग्राहकांना एपीएमसीमध्ये न येता फोनवर ऑर्डर द्यावी अशी विनंती केली आहे. तसेच एपीएमसी मधील गर्दी कमी करण्यासाठी आणि रोग प्रतिबंधक उपाय करण्यासाठी गुरूवार आणि रविवार या दोन दिवशी एपीएमसी बंद करून स्वच्छ करण्यात येणार आहे. मार्केटच्या गेटवर सॅनिटायजरच्या बॉटल ठेवण्यात येणार असून येणाऱ्या प्रत्येकाला मास्क किंवा रूमाल लावणे अनिवार्य करण्यात आले आहे.


Coronavirus | मुंबई लोकल ट्रेन बंद करण्याचा निर्णय मुख्यमंत्री घेणार : राजेश टोपे

मुंबई,  नवी मुंबई,  कल्याण-डोंबिवली या भागातून हजारोच्या संख्येने किरकोळ व्यापारी एपीएमसी मार्केटमध्ये शेतीमाल खरेदी करण्यासाठी येत असतात. मात्र आता त्यांना मार्केटमध्ये न येण्याचा सल्ला देण्यात आला आहे. व्यापारी आपल्या टेम्पोने ग्राहकांपर्यंत त्यांचा माल पोहचविणार आहेत. एपीएमसीमधील आवक जावक कमी करण्यासाठी व्यापाऱ्यांनी हा घेतला निर्णय.

Coronavirus Vaccination | कोरोनावर लस शोधल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा | ABP Majha



शीघ्र नाशवंत माल असल्याने एपीएमसी मार्केट बंद ठेवणे शक्य नाही. बंद केल्यास शेतकरी वर्गाचे लाखोंचे नुकसान होवू शकते तर दुसरीकडे शहरातील ग्राहकांना जीवनावश्यक वस्तू मिळणे दुरापास्त होण्याची शक्यता असल्याने एपीएमसी बंद न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

coronavirus | राज्यभरातील बहुतांश मंदिर बंद, गर्दी टाळण्यासाठी निर्णय

राज्यात अशी आहे पॉझिटिव्ह रुग्णांची स्थिती

पिंपरी चिंचवड मनपा- 9

पुणे मनपा - 7

मुंबई - 6

नागपूर - 4

यवतमाळ - 3

नवी मुंबई - 3

कल्याण - 3

रायगड -1

ठाणे -1

अहमदनगर -1

औरंगाबाद -1

एकूण – 39

कोरोना व्हायरस महामारी म्हणून घोषित

कोरोना व्हायरस जगातील 111 देशांमध्ये फोफावला आहे. या व्हायरसमुळे आतापर्यंत जगभरात चार हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोना व्हायरसला जगात महामारी म्हणून घोषित केलं आहे. तसंच कोरोनाविरोधात संपूर्ण जगाने आता एकजूट होऊन लढावं, असं आवाहनही जागतिक आरोग्य संघटनेने केलं आहे.

#coronavirus | कोरोना व्हायरसचा महाराष्ट्रात पहिला बळी, कस्तुरबा रुग्णालयात उपचारादरम्यान 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू