मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक पावलं उचलण्यात येत आहेत. अशातच राज्यातील शाळा आणि महाविद्यालयं बंद करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील लोकसंख्या पाहता गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे गर्दी कमी करण्याचा प्रयत्न सरकारकडून होताना दिसत आहेत. आज राज्य सरकार आणि काही खासगी कंपन्यांमध्ये चर्चा झाली. या चर्चेनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यासंदर्भात माहिती दिली.
राज्य सरकार आणि खासगी कंपन्यांमध्ये झालेल्या बैठकीला 20 कंपन्यांचे प्रमुख उपस्थित होते. या बैठकीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली असून लार्सन अँड टुब्रो, रिलायन्स इंडस्ट्रीज, औषध आणि मनोरंजन क्षेत्रातील कंपन्यांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. याबाबत बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, खासगी कार्यालयं बंद करण्यासंदर्भात कंपन्यांसोबत सकारात्मक चर्चा असून या कंपन्या सहकार्य करण्यास तयार आहेत. कॉर्पोरेट आणि मनोरंजन क्षेत्रातल्या कंपन्यांसोबत चर्चा झाली आहे. यावेळी राज्य सरकारकडून जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची परवानी द्या, असा प्रस्ताव या कंपन्यांसमोर ठेवण्यात आला. त्यावेळी अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमच्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
Coronavirus | जगभरात 24 तासांत 600 पेक्षा जास्त कोरोनाग्रस्तांचा मृत्यू
आज सकाळी मुंबईतील एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला असून राज्य सरकारनं अनेक महत्त्वाची पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. याबाबत बोलताना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की, 'लोकल आणि मेट्रोमधील गर्दी टाळण्यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे. लोकल, मेट्रो यांसारख्या सेवा बंद करण्याबाबतचे निर्णय थेट आरोग्य मंत्रालय घेऊ शकत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत याबद्दलचा योग्य तो निर्णय घेण्यात येईल.'
दरम्यान, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी बहुतांश जण फेस मास्क आणि सॅनिटायझर खरेदी करत आहेत. याचा गैरफायदा घेऊन बोगस, दुय्यम दर्जाची उत्पादनं बाजारात आणली जात आहेत. अशा बोगस उत्पादनांची विक्री करणाऱ्यांवर एफडीएच्या माध्यमातून कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही आरोग्यमंत्री टोपे यांनी दिला आहे.
संबंधित बातम्या :
Coronavirus | स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित सर्व निवडणुका स्थगित
Coronavirus | कोरोना व्हायरसचा भारतात पहिला बळी, कर्नाटकातील 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
Coronavirus | कोरोना व्हायरसचा देशातला दुसरा बळी, दिल्लीत 68 वर्षीय महिलेचा मृत्यू