कोरोनामुळे सोनं आणि चांदी स्वस्त झाली आहे. गुढीपाडवा आणि लग्नसराईच्या तोंडावर सोन्याच्या दरात घसरण झाल्याने ग्राहकांसाठीही खुशखबर आहे. परंतु मागील काही दिवसांपासून सराफा बाजारात शुकशुकाट आहे. मात्र तरीही ग्राहकांनी बाजारात पाठ फिरवल्याचंच चित्र आहे.
दुसरीकडे चांदीचा दर प्रति किलो 6445 रुपयांनी घसरला. राजधानी दिल्लीत सोमवारी (१६ मार्च) दिल्लीत सोन्याच्या दरात 455 रुपयांनी वाढ होऊन 41,610 रुपये प्रतितोळा झालं होतं. तर चांदी मात्र 1,283 रुपयांनी घसरुन 40 हजार 304 रुपये किलोंवर पोहोचली होती. शुक्रवारी (१३ मार्च) सोन्याचा दर प्रतितोळा 42 हजार 017 रुपयांवर बंद झाला होता.