मुंबई : शेअर बाजारासाठी आजचा दिवस ब्लॅक फ्रायडे ठरला आहे. सुरुवातीच्या घसरणीनंतर सेन्सेक्स आणि निफ्टी दीड तासांनी शेअर मार्केट सावरला आहे. आजच्या दिवसाची सुरुवात झाल्यावर सेन्सेक्स सुमारे 3100 तर निफ्टी 950 अंकांनी कोसळला होता. परंतु त्यात सुधारणा झाली असली तरी सध्या सेन्सेक्समध्ये 400 आणि निफ्टीमध्ये 138 अंकांची घसरण आहे. कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील पडझडीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही पाहायला मिळत आहे. त्यामुळे भारतीय बाजारातल्या गुंतवणूकदाराचं तब्बल 14 लाख कोटींचं नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. तर तिकडे सोन्याच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. कालच्या (12 मार्च) तुलनेत आज सोन्याचा दर प्रतितोळा 2600 रुपयांवर आला आहे. काल सोन्याचा दर प्रतितोळा 44 हजार 200 इतका होता, तर आज सोन्याचा दर 41 हजार 600 रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे सोनं खरेदीदारांची आज मोठी गर्दी पाहायला मिळू शकते.
लोअर सर्किट लावलं आणि व्यवहार 45 मिनिटांसाठी बंद
शेअर बाजारात गुरुवारी (12 मार्च) लोअर सर्किट लागता लागता राहिलं. शेअर बाजार लोअर सर्किट म्हणजे 10 टक्क्यांच्या घसरणीपर्यंत पोहोचला होता. सुदैवाने तो प्रत्येक वेळी रिकव्हर झालं. ही घसरण इतिहासातील सर्वात मोठी घसरण असल्याचं म्हटलं जात होतं. जुलै 2017 नंतर निफ्टी 9600 च्या स्तराच्या खाली पोहोचला. पण शुक्रवारी व्यवहारांना सुरुवात झाल्यानंतर काही मिनिटांतच निफ्टीमध्ये 10 टक्क्यांपेक्षा जास्त घसरण झाली आणि लोअर सर्किट लावण्यात आलं. परिणामी व्यवहार 45 मिनिटांसाठी बंद करण्यात आले. लोअर सर्किट लावल्यानंतर व्यवहार 45 मिनिटं बंद राहतात आणि पुन्हा 15 मिनिटांसाठी मार्केट प्रीओपन होतं.
सेन्सेक्समध्ये गुरुवारी (12 मार्च) मागील सुमारे 12 वर्षांमधील सर्वात मोठी घसरण पाहायला मिळाली होती. याआधी 2008 मध्ये एवढी मोठी घसरण झाली होती. मात्र गुरुवारी लोअर सर्किट लागलं नाही. पण आज (13 मार्च) 9.43 टक्क्यांच्या घसरणीनंतरच निफ्टीमध्ये लोअर सर्किट लावण्यात आलं आणि खरेदी-विक्री व्यवहार 45 मिनिटांसाठी बंद करण्यात आले. हे 45 मिनिटं पूर्ण झाल्यानंतर मार्केट 15 मिनिटांसाठी प्रीओपन झालं. त्यातही नकारात्मक परिणाम दिसले तर पुन्हा एकदा लोअर सर्किट लावलं असतं. सुदैवाने सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये सुधारण झाल्याचं चित्र आहे.
शेअर बाजाराच्या इतिहासात आतापर्यंत चार वेळा सेन्सेक्समध्ये लोअर सर्किट लावण्यात आलं होतं आणि शेअर बाजार ठप्प झाला होता.
1. सर्वात पहिल्यांदा 21 डिसेंबर 1990मध्ये लोअर सर्किट लावण्यात आलं होतं. त्यामुळे सेन्सेक्समध्ये 16.19 टक्क्यांच्या घसरणीची नोंद झाली होती. या घसरणीनंतर शेअर बाजार 1034.96 च्या स्तरावर पोहोचला होता.
2. शेअर बाजारचा इतिहास पाहूनच समजतं की, सेन्सेक्समध्ये दुसऱ्यांदा सर्वात मोठी घसरण 28 एप्रिल 1992 मध्ये झाली होती. तेव्हा सेन्सेक्समध्ये 12.77 टक्के घसरण झाली होती. त्यादिवशी शेअर बाजार 3896.90 च्या स्तरावर बंद झाला होता.
3. लोअर सर्किट लावण्याची तिसरी वेळ 17 मे 2004 रोजी आली होती, जेव्हा शेअर बाजारात 11.14 टक्क्यांची घसरण झाली होती. तेव्हा शेअर बाजार 4505.16 च्या स्तरावर जाऊन बंद झाला होता.
4. गुरुवार (12 मार्च) सारखी घसरण याआधी 20शेअर मार्केट, शेअर बाजार, सेन्सेक्स, निफ्टी, लोअर सर्किट, कोरोना व्हायरस, कोरोना, कोरोनाव्हायरस, कोरोना इफेक्ट08 मध्ये दिसली होती. 24 ऑक्टोबर 2008 रोजी सेन्सेक्समध्ये 10.96 टक्क्यांची घसरण झाली होती आणि लोअर सर्किट लावण्यात आलं होतं. त्या दिवशी शेअर बाजार 8701.07 वर बंद धाला होता.
Coronavirus | शेअर बाजारासाठी ब्लॅक फ्रायडे; सेन्सेक्स, निफ्टी कोसळला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Mar 2020 10:42 AM (IST)
शेअर बाजारात आजही मोठी घसरण पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील पडझडीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही पाहायला मिळत आहे.
NEXT
PREV
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -