एक्स्प्लोर

Coronavirus | कोरोनाबाधितांमध्ये 80 टक्के लक्षणविरहित, सरकारसमोर नवं संकट

राज्यात Asymptomatic म्हणजेच लक्षणविरहीत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे या सायलेंट कॅरियरच्या माध्यमातून संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता आहे.

मुंबई : कोरोना व्हायरसशी लढताना सरकारसमोर नवं संकट उभं राहिलं आहे. कारण 80 टक्के प्रकरणांमध्ये कोरोना व्हायरसची लक्षणंच दिसत नाहीत. मागील काही दिवसांची राज्यातील आकडेवारी स्पष्ट करतेय की Asymptomatic म्हणजेच लक्षणविरहीत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे या सायलेंट कॅरियरच्या माध्यमातून संसर्ग वाढण्याचा धोका वाढतो आहे.

कालपर्यंत (20 एप्रिल) 2336 रुग्णांपैकी 1890 म्हणजेच तब्बल 81 टक्के रुग्ण Asymptomatic आढळून आले आहेत. तर 19 एप्रिलपर्यंत 82 टक्के, 18 आणि 17 एप्रिलपर्यंत प्रत्येकी 79 टक्के आणि 16 एप्रिलपर्यंत 80 टक्के Asymptomatic आढळून आले आहेत. याचाच अर्थ कोरोना झालेली व्यक्ती धडधाकट दिसत असली तरी ती सायलेंट कॅरियर म्हणून इतरांना संक्रमित करु शकते. यामध्ये लहान बालकं, वयोवृद्ध किंवा विविध आजारांनी त्रस्त असलेल्यांसाठी हे अतिशय धोकादायक ठरु शकते.

अशा परिस्थितीत असिम्पटोमॅटिक रुग्णांची तपासणी न करणं यामुळे पुढील दिवसात आकड्यांमध्ये घट दिसू शकते, मात्र संसर्ग वाढण्याचा धोका असल्याची भीती विरोधी पक्ष नेत्यांनीही व्यक्त केली आहे. त्यामुळे देशात कोरोनाचा एपी सेंटर ठरलेल्या मुंबईत कोविड 19 च्या तपासणीच्या निकषात मुंबई महापालिकेने केलेल्या बदलांबाबत गांभीर्याने विचार करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा साडेचार हजारांच्या पुढे राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. राज्यात सोमवारी (20 एप्रिल) 466 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 4666 वर पोहोचला आहे. यामध्ये सर्वाधिक मुंबईत 3032 लोक कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यानंतर पुण्यात 594 जण कोरोनाबाधित आहेत. राज्यात काल दिवसभरात 9 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यातील सात मुंबईतील तर दोनजण हे मालेगाव येथील आहेत. दरम्यान, राज्यातील दोन शहरं मुंबई आणि पुण्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून हा सर्वांच्याच चिंतेचा विषय झाला आहे.

Coronavirus Update | 80 टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणंच नाहीत!

महत्त्वाच्या बातम्या

चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2026 | सोमवार

व्हिडीओ

Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report
Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : होर्मुझमधून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, इराणकडून अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले सुरुच
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, ट्रम्प यांची घोषणा  
Mutual Fund : 2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
Team India : टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
INDW vs ENGW: भारताच्या लेकींनी लॉर्डसवर इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, क्रांती गौड, यास्तिका भाटियाची दमदार कामगिरी
भारताच्या लेकींनी इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, लॉर्डसवरील पहिल्याच कसोटीत विजयाचा झेंडा रोवला

Embed widget