मुंबईतल्या खासगी रुग्णालयातही मिळणार कोरोनाची लस, 29 खासगी रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी
सरकारी रुग्णालयांसोबत 29 खासगी रुग्णालयांमध्येही लसीकरण होणार असल्याची माहिती मुंबई पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी दिली आहे.

मुंबई : कोविड लसीकरण केंद्रावरील गर्दी टाळण्यासाठी खाजगी रुग्णालयातही लस देण्याची परवानी देण्यात आली आहे. आता सरकारी रुग्णालयांसोबत 29 खासगी रुग्णालयांमध्येही लसीकरण होणार असल्याची माहिती मुंबई पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी दिली आहे. केंद्र सरकारचे निकष पाळणाऱ्या रुग्णालयांनाच लसीकरणाची परवानगी देण्यात आले आहे.
लसीकरणाचा दुसरा आणि महत्त्वपूर्ण टप्प्यास 1 मार्च पासून संपूर्ण देशात सुरुवात झाली. कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन बहुतांश जेष्ठ नागरिक आणि 45 वर्षावरील सहव्याधी असलेल्याला नागरिकांनी पहिल्याच दिवशी मोठ्या उत्साहात लसीकरणसाठी नोंदणी राज्यभर केल्याचे चित्र आढळून आले. मोठ्या प्रमाणात नागरिकांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी केली होती. मात्र लसीकरणसाठी असलेल्या पोर्टलवरील तांत्रिक अडचणीमुळे अनेक नागरिक अनेक तास केंद्रांवर तसेच बसून होते. अनेकांना लस न घेता परतावे लागले तर काहींना केंद्रावरील अभूतपूर्व गोंधळाचा सामना करावा लागला त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने हा निर्णय घेतला आहे. संध्याकाळी आयुक्तांकडून 29 प्रायवेट हॉस्पिटल ला लसीकरणासाठी मंजूरी देण्यात आली आहे. या संदर्भात मुंबई महानगरपालिकेने ट्वीट केले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका केंद्रांव्यतिरिक्त आता, भारत सरकारने जाहीर केलेल्या निकषांची पूर्तता करणाऱ्या २९ अतिरिक्त खाजगी रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी देण्यात आली आहे. #MyBMCUpdates#NaToCorona pic.twitter.com/9YkaPTUpEf
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) March 2, 2021
देशात कोरोनाच्या लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु झाला असून यामध्ये 60 वर्षावरील नागरिकांना आणि ज्यांना गंभीर आजार आहे अशा 45 वर्षावरील नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. या टप्प्याला सोमवार एक मार्चपासून सुरुवात झाली असून या एकाच दिवशी तब्बल 25 लाख लोकांनी लसीकरणासाठी नोंद केल्याचं पहायला मिळतंय.
Before You Go
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा






















