मुंबई : कोरोनाचा उद्रेक महाराष्ट्रात वाढत असताना मुंबईत कोरोना आणीबाणीची वेळ आली आहे.  त्यासाठी  महापालिका आयुक्तांचा महापालिकेचा अॅक्शन प्लॉन तयार करण्यात आला आहे. मुंबईत आरोग्य सुविधेवर मोठा ताण येत आहे. त्यातच काही खासगी रुग्णालयांमध्ये सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांनीही बेड अडवून ठेवले आहेत. यावर उपाय म्हणून मुंबई महापालिकेनं अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रात्रीच्या वेळेत रुग्णांना तातडीनं बेड उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई महापालिकेच्या प्रत्येक वॉर्डात नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे.


 कोरोना रुग्णांमध्ये ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्यास त्यांना तातडीनं उपचाराची गरज लागते. मात्र, अनेकदा बेड मिळत नाही. रात्रीच्या वेळेस बेड मिळवताना रुग्णांना प्रचंड त्रास होतो. लोकांना होणारा हा त्रास कमी व्हावा म्हणून नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यानुसार, मुंबई महापालिकेच्या 24 वॉर्डातील 'वॉर रूम' व जम्बो फिल्ड हॉस्पिटलसाठी हे नोडल अधिकारी काम करतील. विशेषत: रात्री 11 ते सकाळी 7 या वेळेत रुग्णांना लवकरात लवकर बेड कसा मिळेल हे पाहण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांवर असणार आहे. हे अधिकारी दुपारी 3 ते रात्री 11 आणि रात्री 11 ते सकाळी 7 अशा दोन शिफ्टमध्ये काम करतील. 'हे नोडल अधिकारी सातत्यानं एकमेकांच्या संपर्कात राहून रुग्णांच्या बेडची व्यवस्था करतील,' असं महापालिकेनं स्पष्ट केलं आहे


मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये 325अतिरिक्त आयसीयू बेडची व्यवस्था करण्यात आली असून एकूण आयसीयू बोडची संख्या 2466 वर गेली आहे. मुंबईत येत्या दीड महिन्यात आणखी तीन ठिकाणी जम्बो कोविड सेंटर उभी राहणार असून याद्वारे दोन हजार बेड उपलब्ध होणार आहेत. यातील 70 टक्के बेड ऑक्सिजनचे असतील आणि 200 बेड आयसीयूचे असतील.


मुंबईतील कोविड पेशंटला योग्य बेड मिळण्यासाठी महापालिका कठोर कार्यपद्धती अवलंबणार



  • नोडल ऑफिसकर कडून फास्टट्रॅक पद्धतीनं बेड वाटप


25 वॉर्डातील वॉर रूमसाठी आणि जम्बो फिल्ड हॉस्पिटलसाठी नोडल आधिकाऱ्याची नेमणूक करणार. दोन शिफ्ट मध्ये करणार काम दुपारी 3 ते रात्री 11 आणि रात्री 11 ते सकाळी 7 यावेळेत काम पाहणार नोडल अधिकारी. वॉर्ड वॉर रूम्सचे नोडल अधिकारी जम्बो फील्ड हॉस्पिटल आणि वॉर रूम एकमेकांशी सतत संपर्कात राहतील जेणेकरून बेड्स लागणा रूग्णांना बेडचे वाटप करणं सहज शक्य होईल. विशेषत: रात्री 11 ते सकाळी 7 दरम्यान सर्व खाटांचे वाटप प्रामुख्याने फक्त जम्बो फिल्ड हॉस्पिटलमध्ये आणि वॉर्ड वॉर रूम्स आणि अनुक्रमे नोडल अधिकाऱ्यांकडून रात्री संपूर्ण फास्ट ट्रॅक पद्धतीनं  बेड वाटप केले जातील



  • लॅबला कोविड रिपोर्ट 24 तासांच्या आत देणे बंधनकारक 


सर्व कोरोना चाचणी करणाऱ्या लॅबला रिपोर्ट देण्यासाठी मिळणार 24 तासाचा अवधी. सर्वांत आधी लक्षण असलेल्या कोरोना रूग्णांचा द्यावा लागणार रिपोर्ट



  • रिकव्हर होणा-या पेशंटला हॉस्पिटलमधील बेडऐवजी हॉटेलमध्ये शिफ्ट करणार


काही पंचताराकित हॉटेलचं रूपातंर कोविड केअर सेंटरमध्ये करण्यात येणार खाजगी डॉक्टाराकडे ही केंद्र चालवण्याची जबाबदारी निश्चित करण्यात येणार



  • रात्रीच्या वेळची बेड आणीबाणी टाळण्यासाठीची सज्जता


 रात्रीच्या दरम्यान रुग्णांनी खाटांसाठी संपर्क साधल्यास हे नोडल अधिकारी त्यांना जम्बो कोविड केंद्र वा इतर ठिकाणी खाटांची रुग्णांच्या स्थितीनुसार उपलब्धता करून देतील आणि या प्रक्रिया त्वरित करून देणे अनिवार्य असणार आहे. रात्री 11 ते सकाळी 7 च्या दरम्यान वॉर्ड वॉर रूममध्ये कॉल करणारे सर्व रूग्ण ज्यांचा कोविड अहवाल आला नसेल किंवा ज्यांची कोविड चाचणी अद्याप झाली नाही, त्यांना संशयित प्रवर्गातील जंबो फील्ड हॉस्पिटलमध्ये बेड्स वाटप करण्यात येईल . या जम्बो हॉस्पिटलमध्ये येताच त्यांना बेडच्या संशयास्पद वार्डात ठेवण्यात येईल पालिकेकडून दररोज 24 तासात प्राप्त होणाऱ्या पॉजिटिव्ह अहवालांची यादी दुसर्‍या दिवशी तात्काळ पुरविली जाईल , जी सर्व चाचणी प्रयोगशाळेद्वारे सकाळी 6 वाजता पालिकेला सादर केली जाईल जेणेकरुन सर्व रुग्णांची मागील दिवशी तपासणीचा अहवाल येऊन . त्यानंतरच्या दुसर्‍या दिवशी सकाळी 8 वाजल्यापासून वॉर्ड वॉर रूम्सकडून फोन केल जाईल  .



  •  हॉस्पिटलमधील बेडस् विनाकारण अडवले जाऊ नयेत म्हणून हॉटेल्सची मदत


काही मोठ्या  तारांकित हॉटेल रूग्णांना मोठ्या प्रमाणात बेड उपलब्ध करुन देण्यासाठी कोविड केअर सेंटरमध्ये रूपांतरित केले जातील.  या केंद्रात प्रशिक्षित डॉक्टर्स नेमले जातील पालिकेने मुंबईतील रूग्णालयात 325 अतिरिक्त आयसीयू बेड जोडले आहेत.  त्यामुळे आताची आयसीयु बेडची संख्या 2466 वर गेली आहे, तर 19,151 बेड वाटप डॅशबोर्डवरील कोविड बेड झाले असून इतर 141 रुग्णालये आहेत त्यातील  3,777 बेड रिक्त आहेत. पालिका येत्या 7 दिवसांत 1100 अतिरिक्त कोविड केअर सेंटर  125 आयसीयूसह कार्यान्वित करेल.



  • मुंबईत बेड वाढवण्यासाठी युद्धस्तरावर काम


मुंबईतील विविध खाजगी रूग्णालयांमधील 325 आयसीयू बेडही पालिकेच्या डॅशबोर्डवर घेतले असून पालिकेच्या वॉर रूममार्फतच त्या बेडवर रूग्ण पाठवले जातील. यामुळं डॅशबोर्डवरील ऑनलाईन आयसीयू बेडची संख्या वाढून 2466 झालीय. तसंच एकूण कोवीड बेडची संख्या 19,151 झाली असून यातील 3777 बेड रिकामे आहेत. मुंबई महापालिका येत्या आठवड्यात आणखी 1100 बेड उपलब्ध करून देणार असून यात 125 आयसीयू बेड आहेत. मुंबईत येत्या दीड महिन्यात आणखी तीन ठिकाणी जम्बो कोवीड सेंटर उभी राहणार असून याद्वारे 2 हजार बेड उपलब्ध होतील. यातील 70 टक्के बेड ऑक्सीजनचे असतील व 200 बेड आयसीयूचे असतील.