एक्स्प्लोर

बनावट कागपत्रांद्वारे खरेदीचे खोटे आदेश काढून कोट्यवधींची फसवणूक, रेल्वेचे बडे अधिकारी जाळ्यात

बनावट कागदपत्रांच्या आधारे खोटे खरेदी आदेश काढून कंत्राटदाराची कोट्यवधीची फसवणूक करणाऱ्या रेल्वेच्या पाच अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. यात रेल्वेच्या सेक्शन इंजिनीअरचाही समावेश आहे. यासाठी भारतीय रेल्वेचा बनावट लोगो, वॉटरमार्क, स्टॅम्प असलेले कागदपत्रांचा वापर केला.

मुंबई : बनावट कागदपत्रांच्या आधारे खोटे खरेदी आदेश काढून कंत्राटदाराची कोट्यवधीची फसवणूक करणाऱ्या रेल्वेच्या पाच अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. यात रेल्वेच्या सेक्शन इंजिनीअरचाही समावेश आहे. मुंबई क्राईम ब्रान्चच्या युनिट 11 ही कारवाई केली आहे. महत्त्वाचं म्हणजे कागदोपत्री दाखवलेला माल प्रत्यक्षात अस्तित्त्वातच नव्हता.

किरण पुरुषोत्तम चौहान, मयुर विनोद सोळंकी, सुभाष रमण सोळंकी, स्वप्नील हेमंत गोसावी आणि अनिलकुमार अहिवार अशी अटक केलेला पाच आरोपींची नाव आहेत. अनिलकुमार मखनलाल अहिवार (वय 52 वर्षे) असं या सेक्शन इंजिनीअरचं नाव आहे. तो रेल्वेच्या महालक्ष्मी कारखान्यात वरिष्ठ अधिकारी आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या तीन आरोपींनी रेल्वेच्या दोन डब्यांना लिंक करण्याकरता लागणाऱ्या पाईपची रितसर ॲार्डर मिळवून देतो असं कंत्राटदाराला सांगितलं. आरोपींनी पश्चिम रेल्वेच्या महालक्ष्मी विभागात सीनियर सेक्शन ॲाफिसर म्हणून कार्यरत असलेल्या अनिलकुमार अहिवार याच्या सहाय्याने हा कट रचला होता.

अनिलकुमार अहिवारच्या मदतीने आरोपींनी कंत्राटदाराला अजनी, नागपूर आणि भुसावळ येथे बोलावून कोणताही माल न दाखवता रेल्वे अधिकाऱ्याच्या मदतीने काम मिळाल्याचे खोटे खरेदी आदेश काढून सह्या घेतल्या. यासाठी भारतीय रेल्वेचा बनावट लोगो, वॉटरमार्क, स्टॅम्प असलेले कागदपत्रांचा वापर केला. पण टेंडर निघत नाही हे समजल्यावर आपली जवळपास तीन कोटी रुपयांना फसवणूक झाल्याचं कंत्राटदाराच्या लक्षात आलं. यानंतर त्याने पोलिसात धाव घेतली.

बनावट कागपत्रांद्वारे खरेदीचे खोटे आदेश काढून कोट्यवधींची फसवणूक, रेल्वेचे बडे अधिकारी जाळ्यात

मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 11 ने या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली होती. तर रेल्वे सेक्शन इंजिनिअर अनिल अहिरराव याला आज ग्वाल्हेरमधून अटक करण्यात आली. या टोळक्याने अशाच प्रकारे अनेकांना कोट्यावधी रुपयाचा गंडा घातला असून यामध्ये आणखी रेल्वे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा संशय मुंबई पोलिसांना आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Diwali Fire Incidents : दिवाळीच्या आतषबाजीमुळे मुंबई, ठाण्यात आगीचे तांडव, डोंगरीत भीषण आग, चेंबूर अन् ठाण्यातही इमारतींना पेट
दिवाळीच्या आतषबाजीमुळे मुंबई, ठाण्यात आगीचे तांडव, डोंगरीत भीषण आग, चेंबूर अन् ठाण्यातही इमारतींना पेट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2026 | रविवार
Rupali Chakankar and Ashok Kharat: तुम्ही बुवाबाजीच्या विरोधात मग अशोक खरातला गुरु का मानलं? रुपाली चाकणकरांनी सांगितलं कारण, म्हणाल्या...
तुम्ही बुवाबाजीच्या विरोधात मग अशोक खरातला गुरु का मानलं? रुपाली चाकणकरांनी सांगितलं कारण, म्हणाल्या...
Rupali Chakankar : कॅप्टन खरातची पाद्यपूजा का केली? कोणत्या महिलांना त्याच्याकडे नेलं? रुपाली चाकणकरांनी सगळंच सांगितलं, आक्षेपार्ह व्हिडीओवरही बोलल्या
कॅप्टन खरातची पाद्यपूजा का केली? कोणत्या महिलांना त्याच्याकडे नेलं? रुपाली चाकणकरांनी सगळंच सांगितलं, आक्षेपार्ह व्हिडीओवरही बोलल्या

व्हिडीओ

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate: सोन्याच्या दरात घसरण कायम, सोन्याचे दर वाढणार की आणखी घसरणार? जागतिक सुवर्ण परिषदेनं दिले मोठे संकेत
Gold Rate: सोन्याचे दर वाढणार की घसरणार? जागतिक सुवर्ण परिषदेनं दिले मोठे संकेत
PM Modi Meets LK Advani : पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिलीज करू शकते, हार्दिक पांड्याच्या ट्रेडला दुजोरा!
मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिलीज करू शकते, हार्दिक पांड्याच्या ट्रेडला दुजोरा!
Ashok Saraf : बरेच रोल केले, बरेच रोल करायचे राहिले, मला पत्थर दिल व्हिलनची भूमिका करायचीय : अशोक सराफ
बरेच रोल केले, बरेच रोल करायचे राहिले, मला पत्थर दिल व्हिलनची भूमिका करायचीय : अशोक सराफ
Babri Masjid Verdict : 'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया
'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
Jay Pawar : दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण; पण आमच्या आयुष्यातील खरा प्रकाश तुम्ही होता Dad, जय पवार यांनी अजितदादांच्या आठवणींना दिला उजाळा
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण; पण आमच्या आयुष्यातील खरा प्रकाश तुम्ही होता Dad, जय पवारांची अजितदादांच्या आठवणीत भावनिक स्टोरी
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 24 टक्क्यांनी तर भारतात 20 टक्क्यांनी कोसळले, फरक नेमका कशामुळं? भारतात सोनं उच्चांकावरुन 36700 रुपयांनी घसरलं
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 24 टक्क्यांनी कोसळले, भारतात सोनं 20 टक्क्यांनी स्वस्त, फरक कशामुळं? 
Embed widget