एक्स्प्लोर

मुंबईतील सोफीटेल हॉटेलबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शनं, कर्नाटकातील आमदारांनी राजीनामा मागे घेण्याची मागणी

सत्ताधारी काँग्रेसच्या 8 आणि जेडीएसच्या तीन आमदारांनी राजीनामा दिला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये आतापर्यंत काँग्रेसच्या 13 आमदारांनी राजीनामा दिला आहे.

मुंबई : कर्नाटकातील सत्ताधारी काँग्रेसच्या 8 आणि जेडीएसच्या तीन आमदारांनी शनिवारी राजीनामा दिला. राजीनाम्यानंतर काँग्रेस आणि जेडीएसचे आमदार मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईत ज्या सोफिटेल हॉटेलमध्ये हे आमदार थांबले आहेत, तेथे महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली.

कर्नाटकातील काँग्रेसच्या आमदारांनी दिलेला राजीनामा मागे घ्यावा, अशी मागणी या कार्याकर्त्यांनी केली. यावेळी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सूरजसिंह ठाकूर यांना पोलिसांना ताब्यात घेतलं आहे. या पार्श्वभूमीवर सोफिटेल हॉटेलच्या बाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तर हॉटेलच्या दिशेने येणाऱ्या सर्व रस्त्यांवरही मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

सत्ताधारी काँग्रेसच्या 8 आणि जेडीएसच्या तीन आमदारांनी राजीनामा दिला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये आतापर्यंत काँग्रेसच्या 13 आमदारांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे कर्नाटकमधील कुमारस्वामी सरकार धोक्यात आलं आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएसच्या आमदारांची संख्या सातत्याने घटत आहे.

राज्यात विधानसभेच्या एकूण 224 जागा आहेत. बहुमतासाठी 113 आमदारांची आवश्यकता असते. काँग्रेसकडे विधानसभा अध्यक्षांसह एकूण 80 आमदार होते. तर जेडीएसकडे 37 आमदार होते. तसेच त्यांच्याकडे बसपाच्या एका आमदाराचा पाठिंबादेखील आहे. तिन्ही मिळून 118 आमदारांच्या संख्याबळावर जेडीएस-काँग्रेस सत्तेत आले होते.

गेल्या काही महिन्यांमध्ये काँग्रेसच्या 13 आणि जेडीएसच्या 3 आमदारांनी राजीनामा दिला आहे. सर्व राजीनामे विधानसभा अध्यक्षांनी स्वीकारले, तर ही संख्या 102 होईल. तर दुसऱ्या बाजुला भारतीय जनता पक्षाकडे 105 आमदार आहेत. तसेच एका अपक्षाच्या पाठिंबादेखील आहे. त्यामुळे 106 आमदारांच्या संख्याबळावर भारतीय जनता पक्ष कर्नाटकात सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरु आहे.

संबंधित बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: भारतासह 14 देशांवर ट्रम्प यांच्याकडून नवे टॅरीफ, भारतीय मालावर लागणार 17 टक्के जादा टॅरीफ
Maharashtra Live News Updates: भारतासह 14 देशांवर ट्रम्प यांच्याकडून नवे टॅरीफ, भारतीय मालावर लागणार 17 टक्के जादा टॅरीफ
Mumbai Local: लोकलमधील अपघातांची मुंबई उच्च न्यायालयाकडून दखल; प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हायकोर्टाचे रेल्वे अन् सरकारला निर्देश, चार आठवड्यांत आराखडा सादर करण्याचे आदेश
लोकलमधील अपघातांची मुंबई उच्च न्यायालयाकडून दखल; प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हायकोर्टाचे रेल्वे अन् सरकारला निर्देश, चार आठवड्यांत आराखडा सादर करण्याचे आदेश
शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकाच्या कंत्राटात चुलत भावानेच पैसे खाल्ले, ओंबळेंच्या मुलीचा आरोप 
शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकाच्या कंत्राटात चुलत भावानेच पैसे खाल्ले, ओंबळेंच्या मुलीचा आरोप 
Cabinet Decision : मोठी बातमी! राज्यातील 33 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोफत धान्य, 3 किलो तांदूळ आणि 2 किलो गहू वाटप, शासनाचा मोठा निर्णय
राज्यातील 33 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोफत धान्य, 3 किलो तांदूळ आणि 2 किलो गहू वाटप, शासनाचा मोठा निर्णय

व्हिडीओ

Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक
Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivajinagar Court Mangesh Kiwale Case: आधी वाटलं किरकोळ वाद, नंतर रक्तबंबाळ होऊन तो हळूहळू चालत आला अन् पडला, हल्ल्यानंतरचे ते चार शब्द बोलले...; प्रत्यक्षदर्शीने सांगितला मंदार किवळेसोबतचा थरार
आधी वाटलं किरकोळ वाद, नंतर रक्तबंबाळ होऊन तो हळूहळू चालत आला अन् पडला, हल्ल्यानंतरचे ते चार शब्द बोलले...; प्रत्यक्षदर्शीने सांगितला मंदार किवळेसोबतचा थरार
Pune Shivajinagar Court Mandhar Kiwale Case: शुभमच्या सख्ख्या भावानेच मंदारवरील हल्ल्याचा कट रचला; पुण्यातील किवळेप्रकरणी सगळ्यात मोठा ट्विस्ट
शुभमच्या सख्ख्या भावानेच मंदारवरील हल्ल्याचा कट रचला; पुण्यातील किवळेप्रकरणी सगळ्यात मोठा ट्विस्ट
Gold Rate : सोने चांदीच्या दरात आज मोठी घसरण, MCX वर सोने 1 लाख 20 हजार रुपयांच्या खाली पोहोचलं, चांदीच्या दरात 8000 रुपयांची घसरण
Gold Rate : सोने चांदीच्या दरात आज मोठी घसरण, MCX वर सोने 1 लाख 20 हजार रुपयांच्या खाली पोहोचलं
Donald Trump : अमेरिकेचा भारतासह एकूण 14 देशांवर नव्यानं 25 टक्के टॅरिफ लादण्याचा इशारा, अखेर भारतानं ठाम प्रत्युत्तर दिलं...
अमेरिकेचा भारतासह एकूण 14 देशांवर नव्यानं 25 टक्के टॅरिफ लादण्याचा इशारा, अखेर भारतानं ठाम प्रत्युत्तर दिलं...
Pune Bopdev Accident : पुण्याच्या बोपदेव घाटातून उतारानं येणारा टेम्पो काळ बनून आला, तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू, दोन जण जखमी 
पुण्याच्या बोपदेव घाटातून उतारानं येणारा टेम्पो काळ बनून आला, तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू, दोन जण जखमी 
Rajasthan : राजस्थानात 24 जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेसचा अध्यक्ष, मुख्यमंत्री भजनलाल शर्मांच्या जिल्ह्यात भाजप उमेदवाराचा पराभव  
राजस्थानमध्ये 37 पैकी 24 जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेसचा अध्यक्ष, मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात भाजपचा पराभव
Pune Firing Case : दोन सूत्रधार पुण्यातून तर तीन हल्लेखोर दौंडमध्ये गजाआड, पुणे कोर्ट गोळीबार प्रकरणात 5 आरोपींना अटक; क्राईम ब्रँचची कारवाई
दोन सूत्रधार पुण्यातून तर तीन हल्लेखोर दौंडमध्ये गजाआड, पुणे कोर्ट गोळीबार प्रकरणात 5 आरोपींना अटक; क्राईम ब्रँचची कारवाई
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2026 | बुधवार
Embed widget