एक्स्प्लोर

काँग्रेस फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढणार!

आता काँग्रेसकडून फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात येणार आहे.

मुंबई: मुंबईतील फेरीवाल्यांवरुन पेटलेलं राजकारण भडकणार असल्याचं चित्र आहे. कारण आता काँग्रेसकडून फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात येणार आहे. काँग्रेस येत्या बुधवारी म्हणजेच 1 नोव्हेंबरला दादरमध्ये मूक मोर्चा काढणार आहे. फेरीवाल्यांना समर्थन देण्यासाठी 'फेरीवाला सन्मान मार्च' काढण्यात येईल. दादरमध्ये मराठी फेरीवालेदेखील आहेत, मात्र सध्या ते दहशतीत आहेत, त्यांना पाठिंबा देण्यासाठी हा मोर्चा काढणार असल्याचं मुंबई काँग्रेसकडून सांगण्यात आलं. मनसेचं आंदोलन एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनधिकृत फेरीवाल्यांना हटवण्याची मागणी रेल्वे आणि प्रशासनाकडे केली होती. त्यासाठी त्यांनी 15 दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. मात्र तरीही फेरीवाले न हटल्याने मनसे कार्यकर्ते मुंबईसह उपनगरातील फेरीवाल्यांना हुसकावून लावत आहेत. मनसे विभाग अध्यक्षाला मारहाण दरम्यान मनसेने मालाडमध्येही फेरीवाल्यांविरोधात आंदोलन केलं. मात्र या आंदोलनादरम्यान  मनसेचे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांच्यावर फेरीवाल्यांनी जीवघेणा हल्ला केला. यात माळवदे यांना जबर जखम झाली. मनसे नेते संदीप देशपांडेंना अटक आणि सुटका मालाडमध्ये मनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांना फेरीवाल्यांकडून झालेल्या मारहाणीनंतर मनसे कार्यकर्त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी मनसे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्कीही झाली. दरम्यान, यावेळी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यासह काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर रात्री उशिरा संदीप देशपांडे आणि इतर कार्यकर्त्यांना सोडण्यात आले. संजय निरुपम यांनी चिथावल्याचा आरोप दरम्यान, संजय निरुपम यांनी चिथावणी दिल्यामुळे फेरीवाल्यांनी मनसे पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप मनसेकडून करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणाला संजय निरुपम जबाबदार असल्याचा आरोप केला जातोय. संजय निरुपम यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची मागणीही मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी केली. राज ठाकरेंनी घेतली सुशांत माळवदेंची भेट फेरीवाल्यांच्या मारहाणीत जखमी झालेले सुशांत माळवदे यांना कांदिवलीच्या ऑस्कर रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांचा मुलगा अमित ठाकरे यांनी रविवारी ऑस्कर हॉस्पिटलमध्ये जाऊन माळवदेंच्या प्रकृतीची विचारपूस केली. संजय निरुपम यांच्याविरोधात गुन्हा दाखल विनापरवागी सभा घेऊन लोकांना कायदा हातात घेण्याचं आवाहन करणाऱ्या मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी निरुपम यांच्या भडकाऊ भाषणाचं व्हिडीओ रेकॉर्डिंगही केलं आहे. शनिवारी संध्याकाळी मालाडमध्ये फेरीवाल्यांनी मनसे विभाग अध्यक्षांवर केलेल्या हल्ल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचं कळतं आहे. सात फेरीवाल्यांविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल मुंबईतल्या मालाड भागात मनसे कार्यकर्त्याला झालेल्या मारहाण प्रकरणी 7 फेरीवाल्यांविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे. काल मालाडमध्ये मनसे कार्यकर्ते सुशांत माळवदे यांना काही फेरीवाल्यांनी जबर मारहाण केली. संबंधित बातम्या : जैसी करनी, वैसी भरनी, संजय निरुपम यांचं मनसेला प्रत्युत्तर राज ठाकरेंनी घेतली मनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदेंच्या भेट  ... तर तुम्हालाही मार खावाच लागणार : संजय निरुपम

मनसे नेते संदीप देशपांडे पोलिसांच्या ताब्यात

दादरमध्ये मनसेकडून फेरीवाल्यांच्या स्टॉलची तोडफोड मालाडमध्ये फेरीवाल्यांचा मनसे कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला  फेरीवाल्यांचा मनसे कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला, आतापर्यंत काय काय झालं? नितेश राणेंचा मराठी 'स्वाभिमान' जागा, मनसेला पाठिंबा

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Mumbai BMC : मुंबईत मोकळ्या जागांचं आरक्षणच धोक्यात? महायुतीनं चार वर्षात 17 भूखंडांच आरक्षण बदललं; कागदपत्रातून धक्कादायक माहिती समोर
मुंबईत मोकळ्या जागांचं आरक्षणच धोक्यात? महायुतीनं चार वर्षात 17 भूखंडांच आरक्षण बदललं; कागदपत्रातून धक्कादायक माहिती समोर
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Sugar Price Hike: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Raju Shetti on Sugar Price Hike : साखरेचे दर पुढच्या दोन महिन्यांमध्ये वाढवायचे आधीच ठरलेलं; सणासुदीत साखर महागली, राजू शेट्टींचा गंभीर आरोप
साखरेचे दर पुढच्या दोन महिन्यांमध्ये वाढवायचे आधीच ठरलेलं; सणासुदीत साखर महागली, राजू शेट्टींचा गंभीर आरोप
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Embed widget