एक्स्प्लोर

प्रशांत ठाकूरांच्या नियुक्तीला काँग्रेसचा विरोध, शिवसेनेतही नाराजी

राज्य शासनाने विविध विकास महामंडळं, मंडळं आणि प्राधिकरणांच्या रिक्त असलेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती पदांवर 21 नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.

मुंबई : राज्य शासनाने विविध विकास महामंडळं, मंडळं आणि प्राधिकरणांच्या रिक्त असलेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती पदांवर 21 नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. नियुक्त्या झाल्यानंतर काही तासातच नियुक्त्यावरून नाराजी आणि विरोधास सुरुवात झाली आहे.

प्रशांत ठाकूर यांच्या नियुक्तीला काँग्रेसचा विरोध प्रशांत ठाकूर यांना सिडकोचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. मात्र या नियुक्तीवर काँग्रेसने विरोध केला आहे. प्रशांत ठाकूर यांची कंपनी सिडकोची कंत्राटदार असून शेकडो कोटी रुपयांची कामे करत आहे. त्यामुळे हे लाभाचं पद असल्याचं सांगत प्रशांत ठाकूर यांच्या नियुक्तीला काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी विरोध केला.

शिवसेनेमध्येही नाराजी याशिवाय महामंडळाच्या नियुक्त्यांवरून शिवसेनेत प्रचंड नाराजी पाहायला मिळत आहे. उदय सामंत, रघुनाथ कुचिक, नितिन बानुगडे-पाटील आणि विनोद घोसळकरांच्या नियुक्तीवरून शिवसैनिक नाराज असल्याचं बोललं जात आहे. काही महिन्यांपूर्वी भाजपनं महामंडळं घोषित केली तेव्हाही शिवसेनेनं नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी 'आम्हाला महामंडळंच नको' असं शिवसेनेचे सचिव अनिल देसाई यांनी म्हंटलं होतं. मात्र निवडणुकांच्या तोंडांवर महामंडळं घेणं ही युतीची लक्षणं आहेत का? अशाही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.

नव्याने घोषित केलेल्या नियुक्त्या

1) हाजी अरफात शेख - अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग

2) जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर - उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग

3) बाळासाहेब ज्ञानदेव पाटील - सभापती, कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ

4) हाजी एस. हैदर आझम - अध्यक्ष, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ

5) सदाशिव दादासाहेब खाडे - अध्यक्ष, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण

6) नरेंद्र अण्णासाहेब पाटील - अध्यक्ष, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ

7) संजय उर्फ संजोय मारुतीराव पवार - उपाध्यक्ष, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ

8) आशिष जयस्वाल - अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ

9) प्रकाश नकुल पाटील - अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ

10) नितिन संपतराव बानगुडे-पाटील - उपाध्यक्ष, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ

11) जगदिश भगवान धोडी - उपाध्यक्ष, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ

12) उदय सामंत - अध्यक्ष, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा)

13) श्रीमती ज्योती दीपक ठाकरे - अध्यक्ष, महिला आर्थिक विकास महामंडळ

14) विनोद घोसाळकर - सभापती, मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळ

15) विजय नाहटा - सभापती, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ

16) रघुनाथ बबनराव कुचिक - अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळ

17) मधु चव्हाण - अध्यक्ष, मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (म्हाडा)

18) संदीप जोशी - अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ

19) प्रशांत ठाकूर - अध्यक्ष, शहर व औद्योगिक विकास महामंडळ (सिडको)

20) मो. तारिक कुरैशी - अध्यक्ष, नागपूर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ

21) राजा उर्फ सुधाकर तुकाराम सरवदे, अध्यक्ष, महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Kharat : रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्या, अन्यथा मंत्रालयासमोर उपोषण करणार; अशोक खरात प्रकरणी करुणा मुंडेंचा इशारा
रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्या, अन्यथा मंत्रालयासमोर उपोषण करणार; अशोक खरात प्रकरणी करुणा मुंडेंचा इशारा
Ashok Kharat : दोन आठवड्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या हाती फाईल, सर्व पुरावे ताब्यात घेतले अन् अशोक खरातभोवती फास आवळला
दोन आठवड्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या हाती फाईल, सर्व पुरावे ताब्यात घेतले अन् अशोक खरातभोवती फास आवळला
Live Blog Updates: अयोध्येत हिंदू नववर्षाच्या पूर्वसंध्येला भक्ती आणि उत्साहाचा संगम
Live Blog Updates: अयोध्येत हिंदू नववर्षाच्या पूर्वसंध्येला भक्ती आणि उत्साहाचा संगम
Raj Thackeray MNS Gudhi Padwa Melava 2026: मुंबईत आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा; ठाकरे बंधूंच्या युतीनंतरचा पहिला मेळावा, राज ठाकरे शिवतीर्थावर काय बोलणार?
मुंबईत आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा; ठाकरे बंधूंच्या युतीनंतरचा पहिला मेळावा, राज ठाकरे शिवतीर्थावर काय बोलणार?

व्हिडीओ

Share Market Update : गुढीपाडव्याच्या दिवशी शेअर बाजारात पडझड, निफ्टीमध्ये 450 हून अधिक अंकानी पडझड
Rupali Thombare Pune : नाशिक कॅप्टन खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्या
Gold And Silver Rate Today Gold Rate News Today News Update ABP Majha
Captain Ashok Kharat Case Today News Update Nashik Crime News ABP Majha
Eknath Shinde Thane : ठाण्यात एकनाथ शिंदे गुढीपाडवा शोभा यात्रेत सहभागी, माझावर EXCLUSIVE

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Global Energy Crisis : इराण-इस्त्रायल युद्धामध्ये टॉपचे दोन गॅस केंद्र भक्ष्यस्थानी, भारतासह जगावर ऊर्जासंकट
इराण-इस्त्रायल युद्धामध्ये टॉपचे दोन गॅस केंद्र भक्ष्यस्थानी, भारतासह जगावर ऊर्जासंकट
FASTag Annual Pass : 1 एप्रिलपासून फास्टॅग टोल पास महागणार; नवा पास कसा मिळवायचा? 
1 एप्रिलपासून फास्टॅग टोल पास महागणार; नवा पास कसा मिळवायचा? 
IPL 2026 : आयपीएल सुरु होण्याअगोदरच चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का,ऑस्ट्रेलियन खेळाडू स्पर्धेबाहेर, CSK नव्या खेळाडूच्या शोधात
IPL सुरु होण्याअगोदरच चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का,ऑस्ट्रेलियन खेळाडू स्पर्धेबाहेर, CSK नव्या खेळाडूच्या शोधात
Atanu Chakraborty Resigns: एचडीएफसी बँकेच्या अध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा पडताच शेअर्स तब्बल 5 टक्क्यांनी घसरले; अतनु चक्रवर्तींचे बँकेच्या कारभारावर गंभीर आरोप
एचडीएफसी बँकेच्या अध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा पडताच शेअर्स तब्बल 5 टक्क्यांनी घसरले; अतनु चक्रवर्तींचे बँकेच्या कारभारावर गंभीर आरोप
Dhananjay Munde : नगरपालिका निवडणुकीच्या काळात मला मोठे मोठे नेते संपवायला निघाले होते, धनंजय मुंडे यांचा गौप्यस्फोट
नगरपालिका निवडणुकीच्या काळात मला मोठे मोठे नेते संपवायला निघाले होते, धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट
Share Market : शेअर बाजारातील घसरणीमुळं गुंतवणूकदारांचं दिवाळं निघालं, सेन्सेक्स 2400 अंकांनी कोसळला, 12 लाख कोटी बुडाले
शेअर बाजारातील घसरणीमुळं गुंतवणूकदारांचं दिवाळं निघालं, तब्बल 12 लाख कोटी बुडाले
Satara ZP Election : सातारा जिल्हा परिषदेवर कोणाची सत्ता? राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेना युती की भाजपची? चार मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
सातारा जिल्हा परिषदेवर कोणाची सत्ता? राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेना युती की भाजपची? चार मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
Bhiwandi Fire News: क्षणार्धात झालं होत्याचं नव्हतं! भिवंडीत फर्निचर मार्केटला आग, 10 ते 12 दुकानं जळून खाक, फोटो आले समोर
क्षणार्धात झालं होत्याचं नव्हतं! भिवंडीत फर्निचर मार्केटला आग, 10 ते 12 दुकानं जळून खाक, फोटो आले समोर
Embed widget