मुंबई : काँग्रेसचे नेते आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयामधील डॉक्टरांची टीम उपचार करणार आहे. ही टीम त्यांच्यावर उपचार करण्यासाठी पुण्याला जाणार आहे. राजीव सातव कोरोनाबाधित असून सध्या त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


राजीव सातव हे राहुल गांधी यांचे विश्वासू नेते आहेत. सातव हे हिंगोलीचे माजी खासदार आहेत. 2014 मध्ये मोदी लाटेतही त्यांचा विजय झाला होता. काँग्रेस आणि गांधी घराण्याची निष्ठा असल्याने त्यांच्याकडे गुजरातच्या काँग्रेस प्रभारीपदाची जबाबदार आहे. गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं होमग्राऊंड आहे. 


कोरोनाची सामान्य लक्षणे दिसल्यानंतर तपासणी केली असता राजीव सातव यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तेव्हापासून त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. परंतु प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना पुण्यातून मुंबईत शिफ्ट करणार असल्याचं म्हटलं जात होतं. परंतु आता मुंबईतील लीलावती रुग्णालयामधील डॉक्टरांची टीम पुण्याला जाणार आहे.