काँग्रेसचे शिष्टमंडळ आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सह्याद्री अतिथीगृह इथे गेले होते. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची भालकेंसोबत भेट झाली आणि त्यांनी "आहात कुठे आजकाल, दिसत नाही," असा प्रश्न विचारला. मात्र त्यावर भारत भालकेंनी उत्तर देणं टाळलं. वैयक्तिक काम असल्याने भारत भालके मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आले होते.
विशेष म्हणजे मागील महिन्यात मुख्यमंत्री फडवणीस आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूर इथे गेले होते. त्यावेळी भालके मुख्यमंत्र्यांना आवर्जून स्वतःच्या घरी घेऊन गेले होते. त्यानंतर भालके भाजपात जाणार असल्याची चर्चा रंगली होती. त्यात आजच्या प्रसंगाची भर पडली आहे.