एक्स्प्लोर

अनिल परब यांनी आता तरी पराभव मान्य करावा अन् मला काम करू द्यावं : काँग्रेस आमदार जिशान सिद्धकी

शिवसेना नेते आणि परीवहन मंत्री अनिल परब मतदारसंघात काम करताना अडथळे आणत असल्याचा आरोप काँग्रेस आमदार आरोप जिशान सिद्धकी यांनी केला आहे.

मुंबई : शिवसेना नेते आणि परीवहन मंत्री अनिल परब माझ्या कामात अडथळा आणत असल्याचा आरोप वांद्रे पूर्व मतदारसंघाचे काँग्रेस आमदार जिशान सिद्धकी यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीत मंत्री अनिल परब यांनी वांद्रे पूर्व विधानसभेतील आपला पराभव आता तरी मान्य करायला हवा. जर याबाबत काहीच झालं नाही तर मला हा विषय विधानसभेत उभा करावा लागणार आहे, असा इशाराही जिशान सिद्धकी यांनी दिला आहे.

जनतेने मला कौल दिला आहे. मला माझ्या मतदारसंघात कामे करू द्यात. जाणीवपूर्वक मला विविध ठिकाणी टाळण्याचा अनिल परब यांनी जो प्रयत्न सुरू ठेवला आहे. हे त्यांना शोभणारे नाही. ते वरिष्ठ मंत्री आहेत. माझ्या मतदार संघात मी करत असलेली छोटी छोटी कामे देखील केवळ वर्षभर एनओसी न मिळाल्यामुळे पडून आहेत. मी आत्तापर्यत याबाबत माझे सर्व वरिष्ठ नेते यांच्याशी पत्रव्यवहार करून त्यांच्या कानावर या सर्व बाबी घातल्या आहेत. आता हा सर्व विषय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानावर मी घालणार आहे. माझ्या मतदारसंघात मी केवळ यांच्यामुळे कामे करू शकत नसेल तर मला याविरोधात आवाज उठवावा लागणार आहे. आणि त्याची सुरुवात आता झाली आहे.अशा पद्धतीची भावना वांद्रे पूर्व विधानसभेचे आमदार जिशान सिद्धकी यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केली आहे. 

आमदार जिशान सिद्धकी यांनी ट्विटर वर अनिल परब यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत नेमकं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न एबीपी माझाने केला असता जिशान सिद्धकी म्हणाले की, मंत्री अनिल परब जाणून बुजून अशा बाबी करत आहेत. मागील दीड वर्षांपासून मी हा त्रास सहन करतोय. मी माझ्या सर्व वरिष्ठ नेत्यांसोबत याबाबत बोललोय. आता मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी देखील बोलावं लागणार आहे. अनिल परब यांना असं वागणं शोभत नाही. तरुणांना दाबण्याचा हा प्रयत्न आहे. ते वरिष्ठ आहेत. आम्ही एकत्र आहोत आणि ते असं वागत असतील तर हे शोभणारे नाही. असे प्रकार वारंवार समोर येत आहे. मी एखादं छोटं काम जरी करत असेल तरी त्याची एनओसी मला वर्ष-वर्ष मिळत नाही. 

महाविकास आघाडी चांगलं काम करत आहे. परंतु, अनिल परब सारखे काही नेते आहेत जे जाणीवपूर्वक असे प्रकार करत आहेत. यासाठी मला आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी बोलावं लागलं आहे. आदित्य ठाकरे माझे चांगले मित्र आहेत. त्यांनी या प्रकरणात थोड्याफार प्रमाणात सुधारणा आणण्याचा प्रयत्न करत आहेत. अनिल परब यांनी लक्ष्यात घ्यायला हवं की मला लोकांनी बहुमत दिलं आहे. त्यांनी त्यांची हार आता तरी मान्य करायला हवी. जर याबाबत काहीच झालं नाही तर मला हा विषय विधानसभेत उभा करावा लागणार आहे. 

माझ्या मतदारसंघातील अनेक वॉर्ड मधील कामे होत नाहीत. त्याठिकाणी असणारे अधिकारी आणि नेते सांगतात आमच्यावर अनिल परब यांचा दबाव आहे. अनिल परब यांनी मी जर काम करतोय तर त्यामध्ये अडचण निर्माण करण्याचा तरी प्रयत्न करू नये. महाविकास आघाडी हा एक कॉमन मिनिमम प्रोग्रॅम घेऊन काम करत आहे. यामध्ये हा एक मंत्री अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे माझ्या पक्षातील सर्व वरिष्ठ नेत्यांसोबत पत्र व्यवहार केला आहे.

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe: आषाढी यात्रेवरही तुकाराम मुंढेंचं लक्ष; वारकऱ्यांना स्वच्छ अन् चांगले अन्नपदार्थ मिळावे, पालकमंत्री फोन करणार
आषाढी यात्रेवरही तुकाराम मुंढेंचं लक्ष; वारकऱ्यांना स्वच्छ अन् चांगले अन्नपदार्थ मिळावे, पालकमंत्री फोन करणार
धक्कादायक! रस्त्यावर चालताना धक्का लागला म्हणून 35 वर्षाच्या तरुणावर थेट हल्ला, उपचार सुरु
धक्कादायक! रस्त्यावर चालताना धक्का लागला म्हणून 35 वर्षाच्या तरुणावर थेट हल्ला, उपचार सुरु
खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ,आता ह्याच्या कपाळावरचा 'गद्दार' डाग कधी पुसणार; उद्धव ठाकरेंची ओमराजेंवर घणाघाती टीका
खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ,आता ह्याच्या कपाळावरचा 'गद्दार' डाग कधी पुसणार; उद्धव ठाकरेंची ओमराजेंवर घणाघाती टीका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जून 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जून 2026 | रविवार

व्हिडीओ

Anandache Paan : 'खोचक रेषा' या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा
Uddhav Thackeray UNCUT PC : ईमान राखवा हे बेईमानचं म्हणतोय... ज्याने शिवसेनेसोबत बेईमानी केली
Rajabhau Waje Majha Katta : निष्ठेचा नवा झेंडा रोवणारा खासदार, राजाभाऊ वाजे 'माझा कट्टा'वर
Mira Road Accidet Special Report : जीव वाचवणारी एअरबॅग ठरली जीवघेणी
Candle march to pay tribute to Ketan Agarwal : केतन अगरवालला श्रद्धांजली वाहण्यासाठी कॅण्डल मार्च

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
France Plane Crash : फ्रान्समध्ये विमान कोसळून 11 जणांचा मृत्यू , सौदी अरेबियात हेलिकॉप्टर क्रॅश, 14 जणांनी जागेवरच जीव सोडला
फ्रान्समध्ये विमान कोसळून 11 जणांचा मृत्यू , सौदी अरेबियात हेलिकॉप्टर क्रॅश, 14 जणांचा जागीच अंत
धक्कादायक! तुरुंगातील लाचखोर अधिकाऱ्याच्या बंद घरातून मध्यरात्री दोघांना अटक; पुरावे नष्ट करण्यासाठी पाठवल्याचा संशय
धक्कादायक! तुरुंगातील लाचखोर अधिकाऱ्याच्या बंद घरातून मध्यरात्री दोघांना अटक; पुरावे नष्ट करण्यासाठी पाठवल्याचा संशय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जून 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जून 2026 | रविवार
उद्धव ठाकरेंच्या गळ्यात कवड्याची माळ, हाती भवानी तलवार; धाराशिवमधून ठाकरेंचा ओमराजेंना म्हणाले, हा 'गद्दार'
उद्धव ठाकरेंच्या गळ्यात कवड्याची माळ, हाती भवानी तलवार; धाराशिवमधून ठाकरेंचा ओमराजेंना म्हणाले, हा 'गद्दार'
Rain Update: मान्सूच्या पहिल्या पावसाचा आनंद, परशुराम घाटातील धबधबा वाहू लागला; पर्यंटकांनी, प्रवाशांनी आनंद लुटला
मान्सूच्या पहिल्या पावसाचा आनंद, परशुराम घाटातील धबधबा वाहू लागला; पर्यंटकांनी, प्रवाशांनी आनंद लुटला
खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ,आता ह्याच्या कपाळावरचा 'गद्दार' डाग कधी पुसणार; उद्धव ठाकरेंची ओमराजेंवर घणाघाती टीका
खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ,आता ह्याच्या कपाळावरचा 'गद्दार' डाग कधी पुसणार; उद्धव ठाकरेंची ओमराजेंवर घणाघाती टीका
Team India Coach: गौतम गंभीरला हटवणार, हा अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होणार; श्रेयस अय्यर कॅप्टन होताच कोणी केली भविष्यवाणी?
गौतम गंभीरला हटवणार, हा अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होणार; श्रेयस अय्यर कॅप्टन होताच कोणी केली भविष्यवाणी?
नीट पेपरफुटीप्रकरणी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोनम वांगचुक यांचे जंतर मंतरवर उपोषण सुरू; कॉकरोच पार्टीच्या आंदोलनाचा आज नववा दिवस
नीट पेपरफुटीप्रकरणी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोनम वांगचुक यांचे जंतर मंतरवर उपोषण सुरू; कॉकरोच पार्टीच्या आंदोलनाचा आज नववा दिवस
Embed widget