एक्स्प्लोर

Mission Shakti यूपीएच्या काळातलं, फक्त त्याची चाचणी केली नव्हती : पृथ्वीराज चव्हाण

चाचणी करायची का नाही हा राजकीय निर्णय होता. आम्ही तो निर्णय घेतला नव्हता. आमचा आमच्या मिसाईलवर विश्वास होता म्हणून आम्ही मिसाईलची चाचणी केली नव्हती, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले.

मुंबई : 'मिशन शक्ती'ची सुरुवात यूपीए सरकारच्या काळात झाली असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री आणि अंतरिक्ष आयोगाचे माजी सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. आम्ही हे मिसाईल 2012 मध्ये तयार केलं होतं. फक्त त्याची चाचणी करायची का नाही हा राजकीय निर्णय होता. आम्ही तो निर्णय घेतला नव्हता. आमचा आमच्या मिसाईलवर विश्वास होता म्हणून आम्ही मिसाईलची चाचणी केली नव्हती, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले. VIDEO | निवडणुकीच्या तोंडावर घोषणा का केली? मोदींच्या घोषणेनंतर पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल | मुंबई | एबीपी माझा पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले की, मी अंतरिक्ष आयोगाचा सदस्य सहा वर्ष काम केलं आहे. आजची ऐतिहासिक घटना आहे. यासाठी निश्चितच शास्त्रज्ञांचे अभिनंदन करायला पाहिजे. मात्र निवडणुकीच्या तोंडावर का घोषणा केली किंवा पंतप्रधानांनी ही घोषणा करावी का? हा प्रश्न आहे, असे ते म्हणाले. राहुल गांधींनी मोठी घोषणा केली होती त्याविरोधात काही घोषणा करणार का? असे प्रश्न होते. पंतप्रधान राष्ट्रीय सुरक्षा बाबत बैठक घेतली म्हणून पाकिस्तान, दाऊद, मसूद याबाबत घोषणा असेल असे वाटले होते पण वेगळी घोषणा झाली, असे ते म्हणाले. या कारवाईचे स्वागत आहे, यासाठी निश्चितच शास्त्रज्ञांचे अभिनंदन आहे, असे ते म्हणाले. गेल्या महिन्यात सॅटेलाईट अंतराळात सोडला असणार. नंतर मिसाईल टेस्ट ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केल्याचं दिसतं आहे, असे ते म्हणाले. अंतराळात भारताचा सर्जिकल स्ट्राईक, 3 मिनिटात सॅटेलाईटचा वेध : पंतप्रधान मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (27 मार्च) देशाला संबोधित केलं. देशाला उद्देशून केलेल्या या भाषणात पंतप्रधान मोदींनी डीआरडीओने अंतराळात केलेल्या कामगिरीची माहिती दिली. "भारताने आज आपलं नाव अंतराळ महाशक्ती म्हणून नोंदवलं आहे. भारताने A-SAT क्षेपणास्त्राच्या मदतीने लो अर्थ ऑर्बिटमध्ये (LEO) एका लाईव्ह सॅटेलाईटचा अवघ्या तीन मिनिटात वेध घेतला. अंतराळातही युद्ध सज्जता असलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे. ही कामगिरी करणारा भारत हा अमेरिका, रशिया आणि चीननंतर हा चौथा देश ठरला आहे, असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. अवघ्या तीन मिनिटांत ऑपरेशन पूर्ण : नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी  म्हणाले की, "काही वेळापूर्वीच आपल्या वैज्ञानिकांनी 300 किलोमीटर अंतरावर 'लो अर्थ ऑर्बिट'मध्ये एका सॅटेलाईटचा वेध घेतला. हे ऑपरेशन अवघ्या तीन मिनिटांतच पूर्ण झालं. 'मिशन शक्ती' नावाचं हे ऑपरेशन अतिशय कठीण होतं, ज्यात उच्च दर्जाची तांत्रिक क्षमतेची आवश्यकता होती." "कोणत्याही देशाचं नुकसान करण्याचा भारताचा इरादा नाही, हे संरक्षणात्मक पाऊल आहे. आमच्या मोहीमेमुळे कोणत्याही आंतरराष्ट्रीय कायद्याचं, तहाचं किंवा करारांचं उल्लंघन झालेलं नाही. आमचा प्रयत्न शांतता ठेवण्याचा आहे, युद्धजन्य परिस्थिती निर्माण करण्याचा नाही," असंही त्यांनी स्पष्ट केलं. देशाची मान उंचावणाऱ्या वैज्ञानिकांचा अभिमान : मोदी आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी वैज्ञानिकांचं कौतुक केलं. सर्व भारतीयांसाठी ही अभिमानाची बाब आहे. ही कामगिरी भारतीय बनवटीच्याच A-SAT या क्षेपणास्त्राद्वारे केली. या अभियानाशी संबंधित सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज त्यांनी पुन्हा एकदा देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. आम्हाला देशाच्या वैज्ञानिकांचा अभिमान आहे. आपल्या उपग्रहांचा फायदा सगळ्यांनाच मिळतो. येत्या काळात त्यांचा वापर आणि महत्त्व वाढणार आहे. अशा परिस्थितीत सुरक्षाही अतिशय महत्त्वपूर्ण आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Vishakha Raut : विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद धोक्यात? शिंदेसेनेच्या सदा सरवणकरांच्या पराभूत लेकीला नगरसेवकपदाची लॉटरी लागणार? 
विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद धोक्यात? शिंदेसेनेच्या सदा सरवणकरांच्या पराभूत लेकीला नगरसेवकपदाची लॉटरी लागणार? 
Vishakha Raut : उद्धव ठाकरेंना बीएमसीत मोठा धक्का, नगरसेविका विशाखा राऊत यांचे कुणबी प्रमाणपत्र रद्द, नगरसेवकपदही धोक्यात
उद्धव ठाकरेंना बीएमसीत मोठा धक्का, नगरसेविका विशाखा राऊत यांचे कुणबी प्रमाणपत्र रद्द, नगरसेवकपदही धोक्यात
Mumbai Ganeshotsav 2026 Local Train And Metro: गणेशभक्तांसाठी दिलासा! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; लोकलवरील मेगाब्लॉकलाही ब्रेक, मंगलप्रभात लोढांचे निर्देश
गणेशभक्तांसाठी दिलासा! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; लोकलवरील मेगाब्लॉकलाही ब्रेक, मंगलप्रभात लोढांचे निर्देश
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस

व्हिडीओ

Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
Embed widget