एक्स्प्लोर

सोनिया गांधींनी वेळ देऊनही गुरुदास कामतांनी भेट घेतली नाही: सूत्र

नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गुरुदास कामत यांना भेटीची वेळ दिली. मात्र, तरीही कामत यांनी सोनिया गांधींची भेट न घेता थेट सर्वपदांचा राजीनामा दिला.   मुंबई पालिका निवडणूक तोंडावर असतानाच मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्याविरोधात गुरुदास कामत, कृष्णा हेगडे आणि इतरांनी दंड थोपटले आहेत. त्याचाच भाग म्हणून काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन गुरुदास कामत यांनी श्रेष्ठींना अप्रत्यक्ष इशाराच दिला आहे. त्यामुळं आता अशा गटातटात विभागलेली काँग्रेस पालिका निवडणूक कशी जिंकणार हा प्रश्न आहे.   पालिका निवडणुकीला अवघं वर्ष उरलं असताना मुंबई काँग्रेसमध्ये धुसफूस सुरु झाली आहे. संजय निरुपम यांच्या कारभारावर नाराज असलेल्यांनी आवाज बुलंद केला आहे. त्यात आघाडी घेतलीय ती गुरुदास कामत यांनी.   नेहमीच्या आक्रमक स्टाईलमध्ये फक्त नाराजी व्यक्त करुन न थांबता कामत यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचाच राजीनामा दिला.   '44 वर्षांपासून मी काँग्रेसमध्ये काम करतो आहे. इतरांना संधी मिळावी म्हणून मी विश्रांती घ्यायचा निर्णय घेतला आहे. 10 दिवसांपूर्वी सोनिया गांधींना भेटून मी निवृत्तीचा विचार बोलून दाखवला. त्यानंतर पत्र पाठवूनही सोनिया आणि राहुल गांधींना निवृत्तीबद्दल माहिती दिली. मात्र त्यांच्याकडून कुठलंही उत्तर आलं नाही. अखेर मी अधिकृतरित्या त्यांना कळवून काँग्रेस आणि राजकारणातून संन्यास घेतो आहे.' अशा माहिती कामत दिली.   कामत यांनी नाराजीचा सूर आळवल्यानंतर आमदार कृष्णा हेगडेंनीही निरुपम यांना घरचा आहेर दिला आहे. ब्लॉक अध्यक्षांच्या निवडीत लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतलं नसल्याचं म्हणत हेगडेंनी आख्खी प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली आहे.   निरुपम अध्यक्ष झाल्यानंतर प्रिया दत्त यांची कोंडी करण्याचा पद्धतशीर प्रयत्न सुरु झाला. ज्यातून निरुपम समर्थक अस्लम शेख आणि दत्त समर्थक नसीम खान यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीही झाली. त्यामुळं मुंबई काँग्रेस परंपरागत देवरा गट, प्रिया दत्त यांचा गट, गुरुदास कामत गट आणि निरुपम गटात विभागली गेली आहे.   एकीकडे भाजप आणि शिवसेनेनं पालिकेसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस अंतर्गत भांडणात गुंतली आहे. नेते नाराज आहेत, कार्यकर्ते सैरभैर आहेत. गटातटामुळं जनतेला नेमका कुणावर विश्वास ठेवायचा हे कळत नाही. आता अशा स्थितीत काँग्रेस पालिका निवडणूक कशी जिंकणार? हा प्रश्न उरतो.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Rain Updates: मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान खात्याकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा, विकेंडला रेड अलर्ट
मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान खात्याकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा, विकेंडला रेड अलर्ट
Maharashtra Rain: राज्यभरात 'आभाळमाया' कायम! मुंबईसह उपनगरात सलग चौथ्या दिवशीही मुसळधार; विदर्भातही पावसाचा जोर कायम, हवामान खात्याचा अंदाज काय?
राज्यभरात 'आभाळमाया' कायम! मुंबईसह उपनगरात सलग चौथ्या दिवशीही मुसळधार; विदर्भातही पावसाचा जोर कायम, हवामान खात्याचा अंदाज काय?
Rain Update School Holiday :  हवामान विभागाचा मुसळधार पावसाचा इशारा, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना 4 जुलैला सुट्टी जाहीर 
हवामान विभागाचा मुसळधार पावसाचा इशारा, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना 4 जुलैला सुट्टी जाहीर 
मुंबईत महानायकांच्या घरात शिरलं पावसाचं पाणी, पण नेत्यांपासून नटांपर्यंत सगळेच गप्प, रोहित पवारांचा टोला  
मुंबईत महानायकांच्या घरात शिरलं पावसाचं पाणी, पण नेत्यांपासून नटांपर्यंत सगळेच गप्प, रोहित पवारांचा टोला  

व्हिडीओ

Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
RBI : आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
Nifty 50 : निफ्टी 50 ने 2 महिन्यांचा उच्चांक गाठला, आयटी आणि रिअल्टी शेअर्सच्या वाढीसह सलग तिसऱ्या सत्रात वाढ कायम
निफ्टी 50 ने 2 महिन्यांचा उच्चांक गाठला, आयटी आणि रिअल्टी शेअर्सच्या वाढीसह सलग तिसऱ्या सत्रात वाढ कायम
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
Embed widget