मुंबई : 'मी मुख्यमंत्री बोलतोय...' या कार्यक्रमात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. गेल्या 10 महिन्यांपासून हा कार्यक्रम प्रसारित न होऊनही सरकारी तिजोरीतून कार्यक्रमाची बिलं परस्पर अदा करण्यात आल्याचा दावा काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलाय.


काही न करता या कंपनीला 10 महिन्यात 2 कोटी 36 लाख रुपये देण्यात आले. या कार्यक्रमासाठी माहिती आणि जनसंपर्क विभागाची सर्व यंत्रणा वापरली जात होती. आपल्या मर्जीतील लोकांना फायदा व्हावा म्हणून हे केले गेले, असा आरोप काँग्रेसने केला आहे.

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी काय आरोप केले आहेत?

“मी मुख्यमंत्री बोलतेय, हा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांनी सुरु केला. हा कार्यक्रम डीजीआयपीआरच्या माध्यमातून सुरु आहे. दरवर्षी 4 ते 5 कोटी खर्च करण्यात येतो. याचे नियोजन करण्याचे कंत्राट एफरवेसंट फिल्मस् प्रायव्हेट लिमिटेडला देण्यात आले आहे. या कंपनीला 2017-18 साठी 4,45,12,800 रुपये देण्यात आले आहेत.”, अशी माहिती सचिन सावंत यांनी दिली. यापुढे त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले.

“नुकत्याच तयार करण्यात आलेल्या कंपनीला, जिला कोणताही अनुभव नाही, अशा कंपनीला या कार्यक्रमाचे कंत्राट का देण्यात आले? एक ऑक्टोबर 2017 ला शेवटचा हा कार्यक्रम झाला, मात्र तरीही त्यानंतरच्या कार्यक्रमाचे बिल काढण्यात आले, तसेच या कंपनीला ते बिल देण्यातही आले.”, असे गंभीर प्रश्न सचिन सावंत यांनी या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाबाबत उपस्थित केले.

संपूर्ण यंत्रणा डीजीआयपीआरची वापरायची आणि प्रंचड खर्च दाखवायचा, पैसे लाटायचे, असे काम या कंपनीचे सुरु आहे, असा आरोप सावंत यांनी केलाय.

“गेल्या 10 महिन्यात हा कार्यक्रम केला गेला नाही, तरी बिलं देण्यात आली आहेत. 10 महिन्यात जवळपास 2 कोटीपर्यंतचे बिल का देण्यात आले. याबाबत चौकशी व्हावी किंवा मग आपल्या जवळच्याना लाभ व्हावा यासाठी हा घोळ घालण्यात आला का? असा प्रश्न पण समोर उभा राहतोय” असेही सावंत म्हणाले.

मुख्यमंत्री कार्यलयाचे स्पष्टीकरण :